जया बच्चन यांची महाकुंभवर टीका; गंगेचे पाणी सर्वात प्रदूषित!

खासदार जया बच्चन यांचा गंभीर आरोप

जया बच्चन यांची महाकुंभवर टीका; गंगेचे पाणी सर्वात प्रदूषित!

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी महाकुंभमेळ्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केली आहे. जया बच्चन म्हणाल्या की, सध्या जगातील सर्वात प्रदूषित पाणी कुंभमेळ्यात आहे. गेल्या महिन्यात चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह नदीत फेकण्यात आले. त्यामुळे पाणी प्रदूषित झाले आहे. हे पाणी तेथील लोकांपर्यंत पोहोचत आहे. या सर्व मुद्द्यांवर कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. यावर माध्यमांनी आवाज उठवला पाहिजे, असे जया बच्चन म्हणाल्या. संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार सामान्य लोकांसाठी कोणतीही विशेष व्यवस्था करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, कुंभमेळ्यात सामान्य लोकांना कोणतीही विशेष वागणूक मिळत नाही. त्यांच्यासाठी कोणत्याही सुविधा नाहीत. दुसरीकडे व्हीआयपी कुंभात जाऊन स्नान करतात, त्यांना विशेष वागणूक मिळते. दुसरे म्हणजे, सरकार खोटे बोलत आहे की कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला पोहोचले आहेत. मला सांगा, इतके कोटी लोक तिथे येतील हे कसे शक्य आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकार जलशक्तीबद्दल जे काही बोलत आहे ते सर्व निरुपयोगी आहे. कुंभमेळ्यात ज्या तपासाची चर्चा होत आहे, त्या निरर्थक आहेत. मृतदेहांचे पोस्टमॉर्टम तर सोडाच, मृतदेह उचलून पाण्यात टाकण्यात आले आहेत, असे जया बच्चन म्हणाल्या.

हे ही वाचा : 

बांगलादेशी, रोहिंग्यांमुळे दिल्लीत वाढली गुन्हेगारी, मतदान नोंदणी, आरोग्य बिघडले

बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांच्याकडून सरस्वती पूजेच्या शुभेच्छा; आश्चर्य व्यक्त!

अभिनेत्री उर्फी जावेद म्हणाली, इस्लाम अमान्य, मुस्लीमाशी लग्न नाही, भगवद्गीता वाचते!

‘राक्षेला पराभूत ठरविणाऱ्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत!’

Exit mobile version