बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी हिंदू समुदायाला सरस्वती पूजेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. वसंत पंचमीनिमित्त, बांगलादेशातील हिंदूंनी सोमवारी (३ फेब्रुवारी) सरस्वती पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. बांगलादेश प्रत्येक धर्म आणि जातीच्या लोकांसाठी एक सुरक्षित ठिकाण असल्याचे युनुस यांनी म्हटले. युनूस म्हणाले की, बांगलादेश हा जातीय सलोख्याचे माहेरघर आहे. हजारो वर्षांपासून, सर्व जाती, रंग आणि धर्माचे लोक या देशात एकत्र राहत आहेत, असे मोहम्मद युनुस म्हणाले.
मोहम्मद युनूस म्हणाले की, अंतरिम सरकार “जाती, धर्म आणि वंश विचारात न घेता सर्वांचे भविष्य सुधारण्यासाठी आणि त्यांचे समान हक्क सुनिश्चित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे”. देवी सरस्वती ‘सत्य, न्याय आणि ज्ञानाच्या प्रकाशाचे प्रतिक आहे. ते पुढे म्हणाले, ‘ती बुद्धी, वाणी आणि माधुर्याची सर्वशक्तिमान देवी आहे’.
हे ही वाचा :
‘राक्षेला पराभूत ठरविणाऱ्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजेत!’
दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा निवृत्त जवान हुतात्मा
शिर्डी हादरली! साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, दोघांचा मृत्यू!
उद्योगपती धनंजय दातार म्हणतात, विकासाभिमुख अर्थसंकल्प
दरम्यान, मोहम्मद युनूस यांनी सरस्वती पूजेनिमित्त हिंदुना शुभेच्छा दिल्या असल्या तरी बांगलादेशमध्ये हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये घट झालेली दिसत नाही. हिंदुंना मारहाण, अत्याचार, जाळपोळ, हत्या, अपहरण अशा घटना घडत आहेत. नुकतीच एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये एका १६ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले होते.
विशेष म्हणजे, या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी उलटला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रारीत आरोपीचे नाव दाखल करूनही आरोपीवर कोणतीही कारवाई झाली नाही आणि मुलीचाही शोध लागला नाही. सर्व जातीच्या लोकांसाठी बांगलादेश सुरक्षित असल्याचे मोहम्मद युनुस बोलत आहेत. मात्र, हिंदुंवरील हल्ल्याच्या घटना पाहता युनुस सरकारचा दिखावापणा स्पष्ट दिसून येत आहे.