केंद्रीय अर्थसंकल्प खरोखर विकासाभिमुख आहे. केंद्र सरकारने कृषी, लघु व मध्यम उद्योग, गुंतवणूक व निर्यात हे प्रगतीचे चालक घटक (इंजिन्स) मानले असून त्यात भरीव व दूरगामी परिणाम घडवणारी पावले टाकली आहेत. नव्या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा फायदा कमी कृषी उत्पादकता असलेल्या १०० जिल्ह्यांतील १.७० कोटी शेतकऱ्यांना होईल व कृषी उत्पादन वाढेल, असे मत आदिल ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स दुबईचे अध्यक्ष डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केले.
डॉ. दातार म्हणाले, डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच फळे व भाज्या आणि कापूस उत्पादन वाढवण्यासाठी आखलेली दीर्घकालीन योजना स्वागतार्ह आहे. लघु व मध्यम उद्योजकांना विनातारण हमी कर्ज साह्य पाच कोटी रुपयांवरुन वाढवून दहा कोटी रुपये करणे आणि महिला तसेच अनुसूचित जाती व जमाती गटांमधील प्रथमच उद्योजक बनणाऱ्यांना पुढील पाच वर्षांत दोन कोटी रुपयांपर्यंतचे मुदत कर्ज देणे या योजनांमुळे उद्योजकतेत नक्कीच वाढ होईल.
हेही वाचा..
संभलमधील सरकारी तलावातील बेकायदेशीर मजार हटवली!
वांद्रे टर्मिनसमधील रिकाम्या ट्रेनच्या डब्यात महिलेवर अत्याचार; हमाल आरोपीला अटक
गोध्रा ट्रेन हत्याकांड: पॅरोलवर असताना फरार झालेल्या जन्मठेपेच्या आरोपीला पुण्यातून अटक
दिल्लीत आपचे ‘अर्ध इंजिन सरकार’
तरुणांमध्ये जागतिक दर्जाच्या कौशल्य विकासासाठी पाच नॅशनल सेंटर्स ऑफ एक्सलन्स स्थापन करणे, खासगी क्षेत्राला संशोधन, विकास व अभिनवता पुढाकार राबवण्यासाठी २० हजार कोटींच्या निधीची तरतूद करणे आणि निर्यात वाढीला उत्तेजन देण्यासाठी देशी उद्योगांना साह्य व प्रोत्साहन देणे, ही सरकारची पावले नक्कीच कौतुकास्पद आहेत, असे दातार म्हणाले.