उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील चंदौसी तहसील भागात सरकारी तलावावर बेकायदेशीरपणे बांधलेली मजार जिल्हा प्रशासनाने हटवली आणि तलाव अतिक्रमणमुक्त केला. अधिकाऱ्यांनी रविवारी (२ फेब्रुवारी) ही माहिती दिली. प्रशासन आता या शासकीय तलावाच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार आहे. राष्ट्रीय सनातन महासंघाच्या अध्यक्षांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात आली.
चंदौसी तहसीलदार धीरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, माई आणि चांदौसी गावांच्या सीमेवर असलेल्या सरकारी तलावावर बेकायदेशीरपणे मजार बांधण्यात आल्याची तक्रार जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मिळाली होती. या मजारीवर जादू-टोना केली जात असल्याचा दावा तक्रारदाराने तक्रारीत केला.
तहसीलदार धीरेंद्र सिंह पुढे म्हणाले, तक्रारीच्या आधारे, प्रशासनाचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले, जेथे तलावावर बांधलेली एक बेकायदेशीर मजार आढळून आली, ज्याचा वापर धार्मिक कार्यासाठी केला जात होता. प्रशासनाने तातडीने कारवाई करून हे अवैध बांधकाम हटवून तलाव अतिक्रमणमुक्त केले. प्रशासन आता या शासकीय तलावाच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
वांद्रे टर्मिनसमधील रिकाम्या ट्रेनच्या डब्यात महिलेवर अत्याचार; हमाल आरोपीला अटक
गोध्रा ट्रेन हत्याकांड: पॅरोलवर असताना फरार झालेल्या जन्मठेपेच्या आरोपीला पुण्यातून अटक
दिल्लीत आपचे ‘अर्ध इंजिन सरकार’
वाल्मिकी समाज आणि दलित महापंचायत केजरीवाल यांच्या विरोधात आक्रमक
राष्ट्रीय सनातन महासंघाचे अध्यक्ष तक्रारदार कौशल किशोर म्हणाले, काल, या बेकादेशीर मजारीची तक्रार जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे केली होती. मोहम्मद जान नावाच्या व्यक्तीने ही बेकादेशीर मजार सरकारी तलावात बांधली होती आणि तो तिथे जादू-टोना करत असे. तक्रारीनंतर प्रशासनाने तपासणी करून बेकादेशीर बांधकामावर तोडक कारवाई केली.