गुजरातमध्ये २००२ साली गोध्रा ट्रेन हत्याकांड घडले होते. या प्रकरणातील जन्मठेपेचा आरोपी पॅरोलवर असताना फरार झाला होता. या आरोपीला आता महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. सलीम जर्दा असे या आरोपीचे नाव असून पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर त्याचा गोध्रा ट्रेन हत्याकांड प्रकरणात सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
सलीम जर्दा हा ५५ वर्षीय आरोपी १७ सप्टेंबर २०२४ रोजी गुजरातमधील तुरुंगातून सात दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोल संपल्यानंतर तो फरार झाला होता. २००२ च्या गोध्रा ट्रेन हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या ३१ जणांपैकी सलीम जर्दा हा एक होता.
हे ही वाचा :
अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर चीनच्या ‘बेल्ट ऍण्ड रोड’मधून पनामा बाहेर!
चीन, कॅनडा, मेक्सिकोनंतर युरोपियन युनियन ट्रम्प यांच्या निशाण्यावर
अयोध्येतील सपाचे खासदार अवधेश प्रसाद धाय मोकलून रडले, पण एकही अश्रु ओघळला नाही!
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेला २५ किलो आयईडी सुरक्षादलाकडून नष्ट!
“२२ जानेवारी रोजी, सलीम जर्दा आणि त्याच्या टोळीतील सदस्यांना एका चोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. पुण्याच्या ग्रामीण भागात चोरी करत असल्याप्रकरणी ही कारवाई होती. तपासादरम्यान, गोध्रा ट्रेन हत्याकांड प्रकरणाशी त्याचा संबंध असल्याचे उघड झाले,” असे आळेफाटा पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितले. तपासादरम्यान जर्दाने केलेल्या चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. २००२ साली गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेसच्या एस- ६ कोचला आग लावल्याप्रकरणी जर्दा आणि इतरांना दोषी ठरवण्यात आले होते. या दुर्दैवी घटनेत ५९ जणांचा मृत्यू झाला होता.