उत्तर प्रदेशात सध्या महाकुंभचा संपूर्ण माहोल असला तरी त्यात वेगळ्या विषयांवरील राजकारणालाही फोडणी देण्याचे काम सुरूच आहे. एका दलित मुलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावरून आता राजकारण पेटले आहे. अयोध्येत या दलित मुलीवर अत्याचार झाले होते. त्यावरून तेथील समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुलीला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली पण ते करताना ते ज्या पद्धतीने धाय मोकलून रडत होते ते पाहता ते खरे रडत आहेत की, फक्त नौटंकी करत आहेत, असा संशय व्यक्त होऊ लागला.
अवधेश प्रसाद यांनी या प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारने कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच प्रभू श्रीराम कुठे आहेत, माता सीता कुठे आहे, अशी सादही घातली. ते करताना ते जोरजोरात रडत होते. त्यांच्यासोबत बसलेल्या सहकाऱ्यांनी त्यांचे डोळे पुसले. पण अवधेश प्रसाद यांच्या डोळ्यातून एकही टिपूस गळला नाही, हेही त्या व्हीडिओत दिसत होते.
हे ही वाचा:
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेला २५ किलो आयईडी सुरक्षादलाकडून नष्ट!
युवराज म्हणतात, केवळ २०-२५ लोकांच्या फायद्याचा अर्थसंकल्प
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो-खोत महाराष्ट्राचा डबल धमाका
भारताच्या युवतींनी जिंकला दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप
त्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मिल्कीपूर येथील सभेत बोलताना म्हटले की, या प्रकरणावरून समाजवादी पक्ष एवढे राजकारण करत आहेत म्हणजेच त्यांचा कुणीतरी या प्रकरणात अडकलेला असला पाहिजे. त्यामुळेच ही नौटंकी सुरू आहे.