छत्रपती संभाजीनगर – ब्राह्मण महिला मंच, घे भरारी फेसबुक ग्रुप व यशस्वी उद्योजिका समूह यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रातील १०० महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. त्यांना शिक्षण रत्न, समाज रत्न, सेवा रत्न, कलारत्न, आरोग्यरत्न असे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. परळीत या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ब्राह्मण महिला मंच, घे भरारी फेसबुक ग्रुप व यशस्वी उद्योजिका समूह यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र शेला स्मृती चिन्ह असे होते.
यावेळी व्यासपीठावर परळीचे माजी नगराध्यक्ष अमृत संस्थेचे सल्लागार बाजीराव भैया धर्माधिकारी परशुराम हिंदू सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा अमृत संस्थेचे सल्लागार विश्वजीत देशपांडे पुणे संभाजीनगर चे माजी उपमहापौर संजय जोशी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस अमृता पालोदकर ब्राह्मण महिला मंचच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात दोन बंधूंनाही गौरविण्यात आले अनिल डोईफोडे नांदेड आणि राजेंद्र पोद्दार वसमत यांचाही समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना बाजीराव धर्माधिकारी म्हणाले, आपली संस्कृती टिकवून व्यवसाय करण्यात उपस्थित महिला अग्रेसर आहेत समाजाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची उन्नती फार महत्त्वाची आहे कारण स्त्री आपल्या पायावर उभी झाली तर आपोआप घर समृद्ध होते. ब्राह्मण महिला मंच करत असलेल्या कार्याचा त्यांनी गौरव केला. विश्वजीत देशपांडे म्हणाले, अमृत संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना बळ मिळणार आहे. तरुण तरुणी व्यावसायिक महिला अशा सर्व घटकांनी योजनांचा लाभ घ्यावा सरकारने यावर्षी १०० कोटी रुपयांच्या योजना केल्या आहेत स्वातंत्र्योत्तर इतिहासात असे पहिल्यांदाच घडत आहे. श्री संजय जोशी व सौ अमृता पालोदकर यांची समयोचीत भाषणे झाली सौ विजया कुलकर्णी यांनी संस्थेचा कार्य अहवाल मांडला.
हे ही वाचा :
अयोध्येतील सपाचे खासदार अवधेश प्रसाद धाय मोकलून रडले, पण एकही अश्रु ओघळला नाही!
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेला २५ किलो आयईडी सुरक्षादलाकडून नष्ट!
‘गेल्या दोन महिन्यांतील अखिलेश यादव यांचे ट्विट बघा, महाकुंभला फक्त विरोध दिसेल’
मुस्लिम टोळीकडून हिंदूंच्या नावाचा वापर, मुलींना फसवून वेश्या व्यवसायात ढकलण्याचे काम
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ.विजया कुलकर्णी, सौ सुषमा पाठक, मीना झालटे, प्रतिमा भाले, .जयश्री चोब, सौ.उज्वला पैठणी, राजश्री एरंडे, वंदना कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले मनिषा खडके यांनी सुंदर रांगोळी काढली राजश्री कुलकर्णी यांनी बहारदार सूत्रसंचलन करून सर्वांची मने जिंकली मीनाताई झाल्टे यांनी आभार प्रदर्शन केले व उज्वला ताईंनी स्वागत गीत गायले. जयश्री डफळापुरकर यांच्या दिशा स्वयंपाक घरच्या भोजनाचा आस्वादही सर्वांनी घेतला आणि मन भरून तोंड भरून कौतुकही केले.
विशेष उललेखनीय म्हणजे चिमुकल्या गिरिजा ठोसर हिने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पडेल ते काम करून सहकार्य केले.