बिहारमधील पूर्णिया येथे हिंदू मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या एका टोळीला पकडण्यात आले आहे. या सेक्स रॅकेटचा प्रमुख आरोपी आफताब नावाचा तरुण असल्याचे सांगितले जात आहे. अंकित तिवारी म्हणून भासवून आफताब हिंदू मुलींना फसवत होता. आरोपी आफताब सोबत मौसम आणि शाकिबसह अनेक लोक होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारी (२९ जानेवारी) पूर्णियातील कटिहार मोड परिसरात टाकण्यात आलेल्या छाप्यात ११ अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली. या सर्वांना वेश्याव्यवसायात ढकलण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांच्या छाप्यात ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ६ पुरुष आहेत तर २६ महिला आहेत.
सुटका केलेल्या एका मुलीने संपूर्ण टोळीबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, या टोळीचा म्होरक्या आफताब खान आहे. त्याने आपले नाव बदलून अंकित तिवारी ठेवले होते. त्याने थार कार खरेदी केली होती आणि त्यावर ‘जय बजरंग बली’ लिहिलेले होते.
आफताब त्याच्या बदललेल्या नावाच्या मदतीने स्वतःला कट्टर हिंदू म्हणवून घेत असे. यानंतर त्याने हिंदू मुलींना अडकवण्यास सुरुवात केली. तो त्यांना लग्नाचे आमिष दाखवून धमकावत असे आणि नंतर त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असे. अहवालानुसार, त्याच्या व्यवसायात आणखी तीन लोक सहभागी होते. या सर्व मुस्लीम तरुणांनी आपले मुस्लिम नाव बदलून हिंदू नाव धारण केले होते.
त्यापैकी एकाचे नाव मोहम्मद शाकिब आहे, त्याने आपले नाव बदलून राजीव शाह असे ठेवले होते. शाकिब वेगवेगळ्या भागातील मुलींना आणायचा आणि त्यांना वेश्याव्यवसायात गुंतवायचा. त्यासोबतच, मौसम खानने त्याचे नाव बदलून ऋषभ साह केले. तो अनोळखी नंबरवरून मुलींशी मैत्री करायचा आणि त्यांना वेश्याव्यवसायात ढकलायचा. मौसमविरुद्ध मुलीच्या हत्येचा गुन्हाही दाखल आहे.
हे ही वाचा :
कुंभमेळा परिसरात चिकन बनवणाऱ्याला साधूंकडून चोप!
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो-खोत महाराष्ट्राचा डबल धमाका
राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिन साजरा
महाकुंभ : अमृतस्नानासाठी तयार रहा, कोणतीही चूक होऊ देऊ नका !
त्याचप्रमाणे गुड्डू खान नावाचा एक तरुणही या संपूर्ण प्रकरणात सामील आहे. या संपूर्ण टोळीत झुबैदा नावाच्या महिलेचाही समावेश आहे. तिने स्वतःचे नाव कतरिना ठेवले आहे. आजूबाजूच्या हिंदू लोकसंख्येमध्ये मिसळण्यासाठी त्या चौघांनीही हिंदू नावे धारण केली होती.
तो मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावण्यासाठी प्रति रात्री १० हजार रुपये आकारत असे. ते मुलींना इतर राज्यांमध्येही विकत असत. मुलींच्या सौंदर्यानुसार त्यांना ५ लाख रुपयांपर्यंत विकले जात असे. तो काही दलालांकडून मुलीही खरेदी करत असे, अशी माहिती सुटका झालेल्या मुलीने दिली.
दरम्यान, या प्रकरणात सुटका करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलींना पोलिसांनी बालसुधारगृहात पाठवले आहे. इतर सर्वांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली आहे. मात्र, आफताब अजूनही फरार आहे. त्याच्यासाठी छापे टाकले जात आहेत.