महाकुंभातील वसंत पंचमीला होणाऱ्या शाही स्नानाबाबत, २ व ३ फेब्रुवारी रोजी प्रयागराज महाकुंभला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे आणि रस्ते विभागाने जय्यत तयारी केली आहे. उत्तर रेल्वे लखनौ विभाग २० कुंभमेळा विशेष गाड्या चालवणार आहे, तर परिवहन महामंडळ लखनौच्या विविध बसस्थानकांवरून ६७० बसेस आणि प्रयागराजसाठी राज्यभरातून ८२०० बसेस चालवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्वत्र लक्ष ठेवण्याच्या आणि व्यवस्थांमध्ये चुका टाळण्यासाठी ‘शून्य त्रुटी’ असा शब्द वापरला आहे.
उद्याच्या शाही स्नानाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (१ जानेवारी) घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, ‘आखाड्यां’ची पारंपारिक ‘शोभा यात्रा’ भव्यतेने आयोजित केली जावी आणि सर्व आवश्यक तयारी वेळेवर पूर्ण केली जावी, असे एका निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले आणि प्रत्येकाची सुरक्षा आणि सोयीची खात्री केली पाहिजे असे सांगितले.
पार्किंगची जागा वाढवावी आणि भाविकांना शक्य तितके कमी चालावे लागेल याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. प्रमुख ठिकाणांवरील वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना नियुक्त केले जावे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. तसेच आज आणि उद्या भाविकांची गर्दी वाढणार असल्याने व्हीआयपी बंदीवर त्यांनी भर दिला. दरम्यान, चेंगराचेंगरीच्या मागील घटनेनंतर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
हे ही वाचा :
सशस्त्र दलातील भरती घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक
वक्फ दुरुस्ती विधेयक संयुक्त समितीचा अहवाल सोमवारी सदर होणार
सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करा
अंबादास दानवेंनी बाळासाहेबांना चूक ठरवले!
प्रमुख स्नान :
१. १३ जानेवारी २०२५ – पौष पौर्णिमा
२. १४ जानेवारी २०२५ – मकर संक्रांत
३. २९ जानेवारी २०२५- मौनी अमावस्या (सोमवती)
४. ३ फेब्रुवारी २०२५ – वसंत पंचमी
५. १२ फेब्रुवारी २०२५ – माघी पौर्णिमा
६. २६ फेब्रुवारी २०२५ – महाशिवरात्री