26 C
Mumbai
Saturday, February 15, 2025
घरविशेषसशस्त्र दलातील भरती घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक

सशस्त्र दलातील भरती घोटाळ्याप्रकरणी एकाला अटक

सीबीआयची कारवाई

Google News Follow

Related

सीबीआयने छापा टाकून पश्चिम बंगालमधील केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) भरती घोटाळ्यातील एका प्रमुख आरोपीला अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले. अटक करण्यात आलेला व्यक्ती महेश कुमार चौधरी असे त्याचे नाव आहे.

पश्चिम बंगालमधील अभियांत्रिकी स्टोअर डेपो मधील शिपाई बनावट कागदपत्रांच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून ओळखला जातो. सीमेवरील जिल्ह्यांसह आणि नक्षल दहशतवादाने प्रभावित झालेल्या राज्यांमध्ये राहण्याचा दावा करणारी बनावट किंवा अनधिकृत अधिवास प्रमाणपत्रे तयार करण्यात तो गुंतला आहे, असे केंद्रीय तपास संस्थेने म्हटले आहे.

हेही वाचा..

वक्फ दुरुस्ती विधेयक संयुक्त समितीचा अहवाल सोमवारी सदर होणार

सोनिया गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करा

अंबादास दानवेंनी बाळासाहेबांना चूक ठरवले!

देशाला आर्थिक महासत्ता, विकसित राष्ट्र बनण्याच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प!

अपात्र उमेदवारांची बेकायदेशीरपणे नियुक्ती केल्याचा आरोपांमध्ये समावेश आहे. नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्याने उमेदवारांकडून थेट तसेच मध्यस्थांकडून मोठी रक्कम गोळा केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने ऑगस्ट २०२३ मध्ये गुन्हा दाखल केला होता. अनेक ठिकाणी झडती घेतल्यानंतर चौधरीला ३१ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याला अलीपूर येथील सीबीआय कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
229,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा