१३ जानेवारी रोजी सुरु झालेला महाकुंभ मेळावा २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आतापर्यंत करोडो भाविकांनी मेळ्याला भेट दिली असून २६ फेब्रुवारीपर्यंत ४५ करोड भाविक भेट देणार असल्याचा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. लाखो साधू-संत मेळ्यात सहभागी झाले आहेत. परदेशातील अनेक लोकांनी मेळ्याला भेट दिली आहे, देत आहेत. याच दरम्यान, कुंभमेळ्यातून एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कुंभमेळा परिसरात चिकन बनवत असल्याचे दिसत आहे. तर याची माहिती साधूंना कळताच त्यांनी त्याला बदडवून काढला आहे.
सोशल मिडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संतापलेले साधू एका व्यक्तीला झोडून काढताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कुंभमेळा परिसरात एका व्यक्तीने चिकन बनवले होते. मात्र, ही माहिती साधूंना समजताच घटनास्थळी दाखल झाले आणि व्यक्तीकडून बनवण्यात आलेले चिकनचे भांडे उलथवून टाकले.
हे ही वाचा :
राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिन साजरा
सीपीआय(एम)चे आमदार एम मुकेश यांच्याविरुद्ध बलात्कार प्रकरणात आरोपपत्र दाखल
महाकुंभ : अमृतस्नानासाठी तयार रहा, कोणतीही चूक होऊ देऊ नका !
अर्थसंकल्पाबद्दल राहुल गांधी यांना शून्य ज्ञान
संतापलेल्या साधूंनी त्याची धुलाई केली. यावेळी एक महिला साधूंना विनवणी करत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, कदाचित ती त्याची पत्नी असावी. महिलेने साधूंची माफी मागितली. यावेळी साधूंनी त्यांचा तंबू देखील उखडून काढला. यावेळी साधूंनी त्याला जाब विचारात तेथील परिसर स्वच्छ करण्यास सांगितले.
पवित्र कुम्भ में मुर्गा मीट बना कर खा रहा था
*बाबा जी ने उसका भरता बना दिया*😐😐 pic.twitter.com/L47j3QSG8L
— ocean jain (@ocjain4) February 1, 2025