अयोध्या जिल्ह्यातील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (२ फेब्रुवारी) मिल्कीपूरमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल करत या पक्षाला ‘सनातनविरोधी’ म्हटले.
मुख्यमंत्री योगी यांनी पोटनिवडणुकीचे वर्णन “राष्ट्रवाद विरुद्ध परिवारवाद” असे केले. “समाजवादी पक्ष सनातन धर्मविरोधी आहे, महापुरुषांच्या विरोधात आहे. ते भारतविरोधी घटक आणि माफियांना आलिंगन देण्याचे काम करतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोप केला की, समाजवादी पक्षाच्या लोकांचा व्यवसाय गुन्हेगारी करणे, गुंडगिरी करणे हा आहे. ”समाजवादियों का नारा है, खाली प्लॉट हमारा है” (समाजवाद्यांचा नारा, रिकामा भूखंड आमचा) असा त्यांचा नारा असल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, “गेल्या दोन महिन्यांतील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष (अखिलेश यादव) यांचे ट्विट पहा. या काळात त्यांनी दिलेली सर्व विधाने या शतकातील सर्वात मोठ्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या विरोधात दिली आहेत.
हे ही वाचा :
मुस्लिम टोळीकडून हिंदूंच्या नावाचा वापर, मुलींना फसवून वेश्या व्यवसायात ढकलण्याचे काम
गडचिरोली: नक्षलवाद्यांकडून माजी सभापतींची हत्या!
अजमेरमधून ४ बांगलादेशींना अटक, घुसखोर भटक्या म्हणून फिरत होते
मालेगाव: बांगलादेशी/रोहींग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा, तिघांना अटक!
ते पुढे म्हणाले, जगभरातील लोक महाकुंभ मेळ्यात सहभागी होत आहेत. गंगा, यमुना, सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात भाविक स्नान करत आहेत. काल उपराष्ट्रपती आले होते, जगातील ७४ देशातील राजदूत आले होते, संत-साधू, जगभरातील भाविक आले आहेत. महाकुंभला येऊन लोक भारावून जात आहेत. पण वेदना समाजवादी पक्षाला होत आहे, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.