भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर मालेगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी-रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी ३१ जानेवारी २०२४ रोजी एफआयआर दाखल केला होता. या आरोपांनंतर मालेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली माहिती.
या प्रकरणी पोलिसांनी सय्यद साजिद, शबाना बानो आणि नजमा बानो यांना बनावट आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या तिघांवरही बनावट कागदपत्रांद्वारे जन्म प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप आहे. न्यायालयाने आरोपीला ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मुस्लिमबहुल क्षेत्र असलेल्या मालेगावमध्ये ३,९७७ बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय जन्म प्रमाणपत्रे मिळवली असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे तहसीलदारांनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा :
भारताच्या युवतींनी जिंकला दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप
युवराज म्हणतात, केवळ २०-२५ लोकांच्या फायद्याचा अर्थसंकल्प
कुंभमेळा परिसरात चिकन बनवणाऱ्याला साधूंकडून चोप!
राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिन साजरा
दरम्यान, देशासह राज्यात घुसखोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, येत आहेत. भारतात बेकादेशीररित्या शिरकाव केलेल्या बांगलादेशीं-रोहिंगेचा तपास सुरु आहे. पोलिसांच्या कारवाई दरम्यान आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे.
बांगलादेशी/रोहींग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा
मालेगाव पोलिसनी गुन्हा दाखल केला
FIR No 40 दिनांक 31/1/2024सय्यद साजिद, शबाना बानो, नजमा बानो या तिघांना जन्म प्रमाण पत्र साठी खोटे कागदपत्र, फसवणूक साठी अटक. 4 तारखेपर्यंत पोलिस कस्टडी.माझा तक्रारी वरून 3977 अर्जदारांची चौकशी होणार pic.twitter.com/rM1JpelfCX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 2, 2025