अयोध्येत एका दलित मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. याच दरम्यान, या प्रकरणाबाबत पत्रकार परिषद घेत असलेले सपा खासदार अवधेश प्रसाद ओक्साबोक्शी रडले. सपा खासदाराचा रडतानाचा व्हिडीओ समोर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. दरम्यान, सपा खासदार अवधेश प्रसाद यांच्या रडण्याला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नौटंकी असल्याचे म्हटले आहे. तसेच जेव्हा या घटनेची चौकशी होईल तेव्हा यामध्ये सपाचे काही बदमाश नक्कीच असतील, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.
मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले, ‘सपा प्रत्येक माफियासोबत आहे आणि त्यांच्या पाठीशी उभा आहे. कोणतीही घटना घडली तरी त्यात सपाचा हात असतो किंवा त्यात सामील असतो. अयोध्येत एका मुलीसोबत एक घटना घडली आहे, त्याची चौकशी झाली की आज त्यांचे खासदार जे नाटक करत आहेत, त्यात काही सपाचे बदमाश नक्कीच सामील असतील.
हे ही वाचा :
भारताच्या युवतींनी जिंकला दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप
युवराज म्हणतात, केवळ २०-२५ लोकांच्या फायद्याचा अर्थसंकल्प
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो-खोत महाराष्ट्राचा डबल धमाका
बांगलादेश : देवीच्या मंदिरात घुसून तोडफोड
दलित मुलीच्या हत्येप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्यही समोर आले आहे. त्यांनी पोस्ट करत म्हटले की, ‘अयोध्येतील दलित मुलीची अमानुषता आणि क्रूर हत्या हृदयद्रावक आणि अतिशय लज्जास्पद आहे. तीन दिवसांपासून गुंजत असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मदतीच्या हाकेकडे प्रशासनाने लक्ष दिले असते, तर कदाचित तिचे प्राण वाचू शकले असते. उत्तर प्रदेश सरकारने या गुन्ह्याची त्वरित चौकशी करावी, दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी आणि जबाबदार पोलिसांवर कठोर कारवाई करावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.