भारतात बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांविरुद्धची मोहीम वेगाने सुरू आहे. त्याचवेळी, राजस्थानातील अजमेरमधून बांगलादेशींना अटक केल्याचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे बांगलादेशी गेल्या एक दशकाहून अधिक काळ अजमेरमध्ये राहत आहेत. तसेच, ते स्वतःला पश्चिम बंगाल राज्यातील असल्याचे सांगून फकिराच्या वेशात फिरत असत.
आलमगीर, शाहीन, सय्यफुल इस्लाम आणि नूर मोहम्मद असे अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील दोघांना अजमेर दर्गा परिसरातून अटक करण्यात आली. यामध्ये सय्यफुल इस्लाम हा बांगलादेशातील छगलनैया महाराजगंज जिल्हा फेनी येथील आहे, तर नूर मोहम्मद अमान हा बाजार लल्यान पोलीस स्टेशन हथजारी फतेहाबाद येथील रहिवासी आहे. दोघेही गुप्तपणे सीमा ओलांडून भारतात आले होते आणि ते फकीर बनून राहत होते.
हे ही वाचा :
भारताच्या युवतींनी जिंकला दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप
युवराज म्हणतात, केवळ २०-२५ लोकांच्या फायद्याचा अर्थसंकल्प
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खो-खोत महाराष्ट्राचा डबल धमाका
राज्यपालांच्या उपस्थितीत तटरक्षक दलाचा स्थापना दिन साजरा
दरम्यान, बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या मोहिमेदरम्यान पोलिसांना मोठी अडचण येत आहे, त्यांना अनेक संशयास्पद लोकांसह आधार कार्ड, रेशन कार्ड, जन प्रमाण पत्र देखील सापडले आहेत. या कागदपत्रांची पडताळणी करणे देखील कठीण आहे. अलीकडेच जयपूर पोलिसांनी बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्धच्या मोहिमेत ५०० बेकायदेशीर संशयितांना अटक केली होती, त्यापैकी २६९ रोहिंग्यांची ओळख पटली होती. यासह पोलिसांची विशेष पथके शोधमोहीम राबवत अशा घुसखोरांवर कारवाई करत आहेत.