मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथील एका रिकाम्या ट्रेनच्या डब्यात महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी राहिल शेख याला अटक केली आहे.
माहितीनुसार, साधारण ५५ वर्षीय महिला ही तिच्या मुलासह शनिवारी रात्री वांद्रे टर्मिनस येथे लांब पल्ल्याच्या ट्रेनने पोहोचले. यानंतर समोर असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये ही महिला गेली होती. त्यावेळी प्रवाशांची वर्दळ कमी असून महिलेने रिकाम्या ट्रेनमध्ये जाताच आरोपीनेही ट्रेनमध्ये प्रवेश केला. आरोपी हमाल असल्याची माहिती आहे. त्याने महिलेवर अत्याचार करून पळ काढला. यानंतर महिलेने घडलेली हकीकत जीआरपीला सांगितली.
हे ही वाचा..
वाल्मिकी समाज आणि दलित महापंचायत केजरीवाल यांच्या विरोधात आक्रमक
धार्मिक संघर्ष टाळण्यासाठी मुक्त विचार, आत्मनिरीक्षण महत्त्वाचे
अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर चीनच्या ‘बेल्ट ऍण्ड रोड’मधून पनामा बाहेर!
चीन, कॅनडा, मेक्सिकोनंतर युरोपियन युनियन ट्रम्प यांच्या निशाण्यावर
यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि जीआरपीने रविवारी आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अटक केली. पोलिसांनी प्राथमिक माहिती देताना म्हटलं की, रिकाम्या ट्रेनमध्ये पीडित महिला का गेली हा प्रश्न आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर वांद्रे टर्मिनसच्या सीसीटीव्हीची पडताळणी केली. आरोपी घटनेनंतर पुन्हा एकदा वांद्रे टर्मिनसमध्ये आला असता त्याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी फुटपाथवर राहतो. आरोपीनं त्याचं नाव राहिल शेख आहे. मात्र, पोलिसांकडून आरोपी देत असलेली माहिती खरी आहे का याची पडताळणी केली जात आहे.