काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा एक निवृत्त जवान हुतात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्यांची पत्नी आणि मुलगीही जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सोमवार, ३ फेबृवारी रोजी दहशतवाद्यांनी निवृत्त सैनिक मंजूर अहमद वाघे यांच्या कुलगाममधील बेघीबाग येथील त्यांच्या निवासस्थानी गोळीबार केला. या हल्ल्यात अहमद, पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र वाघे यांचा मृत्यू झाला. पत्नी आणि मुलगी यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
हे ही वाचा :
शिर्डी हादरली! साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला, दोघांचा मृत्यू!
इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट
‘त्रिवेणी’ अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळवणाऱ्या भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन आहेत कोण?
उद्योगपती धनंजय दातार म्हणतात, विकासाभिमुख अर्थसंकल्प
हल्ल्यानंतर, सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने परिसराला वेढा घातला. तसेच हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या घटनेमुळे या भागात तणाव वाढला असून सुरक्षा राखण्यासाठी आणि हल्लेखोरांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.