बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते विजय कुमार सिन्हा यांनी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. सिन्हा यांनी लालू यादव यांना ‘जंगलराज विद्यापीठाचे प्राचार्य’ असे संबोधले. पटण्यात पत्रकारांशी बोलताना विजय कुमार सिन्हा म्हणाले, “लालू यादव यांच्या जंगलराज विद्यापीठात जे कोणी शिकले आहेत किंवा प्रशिक्षण घेतले आहे, ते सगळे अराजकतेचे प्रतीक आहेत. हे अराजकता निर्माण करणारे लोक आहेत. त्यामुळे या गटात महापुरुषांचा, दलितांचा, गरीबांचा आणि बिहारवासीयांचाही सन्मान केला जात नाही.
त्यांनी पुढे म्हटले की, “लालू यादव यांनी बिहारला अपमानित केले आहे. आपल्या संस्कृतिक वारशाचा संपूर्ण देश अभिमानाने उल्लेख करतो, पण लालू यादव यांनी बिहारचे नामोहरम आणि कलंकित केले. ते आजही त्याच जुनाट मानसिकतेत अडकलेले आहेत. तेजस्वी यादव यांच्या ‘जमाई आयोग’च्या स्थापनेवरून, परिवारवादाच्या मुद्द्यावर, विजय सिन्हा यांनी लालू यादव यांच्यावर निशाणा साधला. “राबडी देवी मुख्यमंत्री झाल्यानंतर राजद ही सासरवादी पार्टी बनली होती. लालू यादव आणि तेजस्वी यादव हे परिवारवादी आणि सासरवादी मानसिकतेचे लोक आहेत. त्याउलट, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कधीच परिवारवादाला प्रोत्साहन दिले नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा..
दोन टप्प्यांत पूर्ण होणार जनगणना
पंतप्रधान मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान
अर्कमूळ : अनेक समस्यांवर करते उपचार
मुंबईतील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
मीठापुर-महुली एलिव्हेटेड रोडच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाबाबत, उपमुख्यमंत्री म्हणाले, “ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या डबल इंजिन सरकारची फलश्रुती आहे. बिहारच्या कुठल्याही कोपऱ्यातून पटणापर्यंतचा प्रवास फक्त तीन तासात पूर्ण व्हावा, हे आमचे ध्येय होते आणि ते आता प्रत्यक्षात येत आहे. बिहारमध्ये विकासाला गती मिळाली आहे. एक भक्कम विकासाची इमारत उभी केली आहे. या रस्त्यामुळे गया परिसरातील नागरिकांना मोठी सोय होईल आणि पटणाच्या वाहतूक कोंडीतूनही मुक्तता मिळेल.







