हुतात्मा ऋषी कुमारवर बेगुसराईमध्ये अंत्यसंस्कार

हुतात्मा ऋषी कुमारवर बेगुसराईमध्ये अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी झालेल्या भूसुरुंग स्फोटात लेफ्टनंट ऋषी कुमारयांच्या पिप्रा कॉलनीतील घरावर शोककळा पसरली आहे. वर्षभरापूर्वीच सैन्यात दाखल झालेल्या या २३ वर्षीय जवानाने जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी हौतात्म्य पत्करलं. सोशल मीडियापासून ते त्याच्या गावापर्यंत सगळीकडून ऋषी कुमारसाठी श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. यामध्येच त्याने त्याच्या आईला केलेले परत येण्याचे वचन तो पाळू शकला नाही हेही सोशल मीडियावर सांगण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरमधील नौशेरा-सुंदरबनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात दोन जवान हुतात्मा झाले असून तीन जण जखमी झाले आहेत.

वृत्तसंस्था पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की नियंत्रण रेषेजवळील लँडमाइनवर लष्कराच्या गस्तीने पाऊल टाकल्यानंतर झालेल्या स्फोटात एक अधिकारी आणि एक सैनिक ठार झाले आहेत. जखमींना लष्कराच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “दोन मृत्यू झाले आहेत. अन्य तीन जण जखमी झाले आहेत.”

वृत्तसंस्था पीटीआयने अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की, ज्या भागात स्फोट झाला तो भाग घुसखोरी रोखण्याच्या व्यवस्थेचा भाग म्हणून लष्कराने पेरलेल्या भूसुरुंगांनी भरलेला आहे.

हे ही वाचा:

भारत-ब्रिटन लावणार खलिस्तान्यांवर चाप

भाजपासाठी का आहे मध्यप्रदेशच्या जोबटचा विजय महत्वाचा?

तेलंगणामध्येही भाजपाचा बोलबाला

‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात

नौशेरा सेक्टर हा भाग राजौरी जिल्ह्यांतर्गत येतो जो जम्मूमधील पिरपंजाल प्रदेशाचा एक भाग आहे.  जेथे गेल्या तीन आठवड्यांपासून लष्कराची कारवाई सुरू आहे. पूंछच्या जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात दोन अधिकाऱ्यांसह नऊ जवान हुतात्मा झाले आहेत. गेल्या १८ वर्षांतील या प्रदेशातील दहशतवादविरोधी ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Exit mobile version