28.9 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरराजकारणभाजपासाठी का आहे मध्यप्रदेशच्या जोबटचा विजय महत्वाचा?

भाजपासाठी का आहे मध्यप्रदेशच्या जोबटचा विजय महत्वाचा?

Google News Follow

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीचे निकाल राज्यातील सत्ताधारी भाजपाला बळकट करणारे आहेत. निवडणूक झालेल्या चार जागांपैकी भाजपाने एक जागा जिंकली आणि दोन इतरांवर आघाडी घेतली. भाजपचा सर्वात मोठा विजय अलीराजपूर जिल्ह्यातील जोबट येथे आहे, ही राखीव अनुसूचित जमातीची जागा आहे जी भाजपाने काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे.

भाजपाच्या सुलोचना रावत यांनी काँग्रेसचे उमेदवार महेश पटेल यांचा ६,१०४ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे रावत यांना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला आणि सामील झाल्यानंतर काही तासांतच त्यांना उमेदवारी देण्यात आली होती.

२०२३ मध्ये होऊ घातलेल्या पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये आदिवासी आणि दलित मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाला जोबट महत्त्वाचा आहे. २०१८ च्या निवडणुकीत, भाजपला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जातींचा प्रभाव असलेल्या जागांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ८२ राखीव जागांपैकी ३४ जागा भाजपाने जिंकल्या होत्या ज्या त्यांच्या २०१३ साली जिंकलेल्या जागांपेक्षा (५९) २५ जागांनी कमी होत्या.

हे ही वाचा:

तेलंगणामध्येही भाजपाचा बोलबाला

‘पंजाब लोक काँग्रेस’सह कॅप्टन मैदानात

आसाममध्ये भाजपाला निर्भेळ यश

भारतीयांना इस्रायलची मैत्री बहुमूल्य

मतमोजणी सुरू असताना भोपाळमधील पक्ष कार्यालयाला भेट देऊन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांना सांगितले, “मतमोजणी सुरू आहे, परंतु आतापर्यंतचे निकाल भाजपसाठी सकारात्मक आहेत. मी जोबटचा परिणाम अतिशय निर्णायक मानतो. भाजपा विरोधात असल्याचे आदिवासींना सांगण्यात आले पण आम्ही त्यांच्यासाठी योजना आणल्या. मला आनंद आहे की आमच्याकडे मतदानाच्या निकालांमध्ये त्यांच्या स्वीकृतीचे पुरावे आहेत. हा आपल्या आदिवासी बांधवांचा आशीर्वाद आहे.”

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा