31 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरविशेषआरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील

आरे वसाहतीत आता बिबट्यांपायी दुचाकीवरून फिरणेही मुश्कील

Google News Follow

Related

नॅशनल पार्कच्या लगतचा परिसर आणि गोरेगावमधील आरे वसाहतीमध्ये बिबट्याचा वावर नेहमी आढळून येतो. जंगलामधील त्यांच्या अधिवासात मानवाने प्रवेश केल्यामुळे बिबट्या आता जंगलालगतच्या शहरी भागात दिसू लागले आहेत. आरे वसाहतीमध्ये बिबट्यांचे मनुष्यावर होणारे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले असून काल (८ ऑक्टोबर) रात्री याच परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा तरुणांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैदही झाला आहे.

रात्रीच्या वेळी दुचाकीवरून दोन तरुण जात असताना रस्त्यालगतच्या झुडूपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या अंगावर झेप घेतली. मात्र, चालकाने प्रसंगवधान राखून वाहनाचा वेग वाढवून दुचाकी पळवल्यामुळे दोघेही तरुण बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. त्यामुळे आरे वसाहतीत रात्रीच्या वेळी दुचाकीवरून प्रवास करणे असुरक्षित असल्याचे समोर आले आहे.

आरे वसाहतीतील युनिट १३मध्ये काल रात्री ९ वाजताच्या सुमारास बिबट्याने १४ वर्षांच्या एका मुलावर हल्ला केला. बिबट्याने या मुलावर हल्ला करून त्याला चांगलेच जखमी केले. हल्ल्यानंतर आरडाओरडा आणि गोंधळ पाहताच बिबट्या जंगलात पसार झाला. परिसरातील रहिवाशांनी मुलाला तत्काळ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेले. या परिसरातील एका महिन्याभरातील बिबट्याच्या हल्ल्याची ही आठवी घटना असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे ही वाचा:

आर्यनच्या अटकेनंतर बायजूने शाहरुखच्या जाहिराती बंद केल्या?

‘बेस्ट’चे चालक आता भाड्याने मिळणार!

खो- खोपटू सारिका काळेने आपल्यावरील चित्रपटाचे मानधन खेळाडूंसाठी का दिले?

नवाब मलिकविरोधात १०० कोटींचा दावा करणार मोहित कंबोज

आरे वसाहतीचा भाग हा जंगल आणि डोंगाराळ असल्यामुळे इथल्या अनेक इमारतींच्या आवारात बिबट्या दिसून येत असतात. परिसरातील कचरा आणि त्याच्या आसपास असणारी भटकी जनावरे विशेषतः कुत्रे यांच्यामुळे बिबट्या आपली शिकार शोधत शहरात प्रवेश करत असतात. त्यामुळे परिसर स्वच्छ ठेवणे, भटक्या जनावरांचा वावर कमी करणे, असे आवाहन वन विभागाकडूनही वारंवार केले जाते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा