परेश रावल यांच्या आगामी ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरनंतर नव्या वादाला तोड फुटले आहे. या पोस्टरमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, ताजमहालच्या घुमटातून भगवान शिवाची मूर्ती बाहेर येत आहे. सोमवारी परेश रावल यांनी हे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. यानंतर वादाला सुरुवात झाली. चित्रपट निर्मात्यांवर वादग्रस्त दाव्यांना प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे.
परेश रावल यांच्या आगामी ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये ताजमहालच्या घुमटातून भगवान शिवाची मूर्ती बाहेर पडताना दाखवण्यात आली आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, “जर तुम्हाला जे काही शिकवले गेले आहे ते खोटे असेल तर? सत्य फक्त लपलेले नाही; त्याचा न्याय केला जात आहे. #TheTajStory द्वारे तथ्ये उलगडून दाखवा, जी ३१ ऑक्टोबर रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.” यावर टीका होताच परेश रावल यांनी मूळ पोस्ट हटवली आहे. यानंतर त्यांनी चित्रपटाच्या निर्मिती टीमचे विधान शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे.
चित्रपट निर्मात्यांनी एक डिस्क्लेमर जारी केला आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, “द ताज स्टोरी चित्रपटाचे निर्माते स्पष्ट करतात की हा चित्रपट कोणत्याही धार्मिक बाबींशी संबंधित नाही, तसेच ताजमहालमध्ये शिव मंदिर असल्याचा दावाही करत नाही. हा चित्रपट केवळ ऐतिहासिक तथ्यांवर केंद्रित आहे. आम्ही तुम्हाला हा चित्रपट पाहण्याची आणि तुमचे स्वतःचे मत मांडण्याची विनंती करतो. धन्यवाद, स्वर्णिम ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड,” असे निवेदनात म्हटले आहे.
‘द ताज स्टोरी’ची निर्मिती स्वर्णिम ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि सीए सुरेश झा यांनी केली आहे. तुषार अमरीश गोयल यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला, विकास राधेशम यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. हा चित्रपट ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हे ही वाचा :
विद्यार्थ्यांनी रचली जनरल- झेड शैली प्रमाणे निषेध करण्याची योजना; प्रकरण काय?
दिवाळीपूर्वी बळीराजाला नुकसानभरपाई मिळणार!
बोगस ‘आयएएस’ची दीडशे जणांना कोट्यवधींची ‘टोपी’!
अहिल्यानगर: ‘आय लव्ह मोहम्मद’ वाद, ३९ जणांना अटक, २०० जणांवर गुन्हा दाखल!
१७ व्या शतकात मुघल सम्राट शाहजहानने बांधलेला ताजमहाल हा अनेकदा वादविवादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. असा दावा केला जातो की ही वास्तू हिंदू मंदिराच्या वर बांधली गेली आहे. याला अद्याप पुष्टी मिळालेली नाही. निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे की, सिनेमा ऐतिहासिक घटनांवर लक्ष केंद्रित करतो आणि धार्मिक वादात पडण्याचा किंवा सत्यापित न केलेले दावे करण्याचा प्रयत्न करत नाही.







