तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि चार वेळा खासदार राहिलेले कल्याण बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शनिवारी (९ ऑगस्ट) पत्रकारांशी बोलताना बॅनर्जी यांनी त्यांना ‘नीच दर्जाचे’ म्हटले आणि त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय असल्याचे सांगितले. श्रीरामपूरचे खासदार बॅनर्जी म्हणाले, “ती महिला माझ्या विषयाचा भाग नाही आणि ती खूप खालच्या दर्जाची आहे. तिच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही. मी तिच्यावर रागावलो आणि दीदींना (ममता बॅनर्जी) काहीतरी बोललो, आता मला पश्चात्ताप होत आहे.”
ते म्हणाले की एका कनिष्ठ वकिलाच्या संदेशाने त्यांचा विचार बदलला आणि आता त्यांना वाटते की या मुद्द्याकडे लक्ष देणे चुकीचे होते. “तो वेळ आणि शक्तीचा अपव्यय होता. तिला महत्त्व देऊन मी चूक केली.”
इंडिया टुडेच्या पॉडकास्टमध्ये सहकारी खासदार महुआ मोईत्रा यांनी ‘डुक्कर’ अशी खिल्ली उडवल्यानंतर कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिला. यानंतर पक्षाकडून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आणि काकोली घोष दस्तीदार यांची लोकसभेतील नवीन मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर सताब्दी रॉय यांची सभागृहातील पक्षाचे नवीन उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली.
महुआ मोइत्रा यांनी एका मुलाखतीत बॅनर्जी यांच्या लग्नावरील टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना म्हटले, “तुम्ही डुक्करशी कुस्ती करत नाही, कारण डुक्कराला ते आवडते आणि तुम्ही घाणेरडे होता. भारतात खूप महिलाद्वेषी, लैंगिकदृष्ट्या निराश, भ्रष्ट पुरुष आहेत आणि त्यांचे संसदेत सर्व पक्षांमध्ये प्रतिनिधित्व आहे.”
हे ही वाचा :
“’ऑपरेशन सिंदूर’ मध्ये पाकिस्तानच्या युक्तीला चेकमेट मिळाला”
५ लाख रुपयांचे आश्वासन, दिले पाच हजार?
किश्तवाडमध्ये दोन दहशतवादी लपल्याची माहिती!
कल्याण बॅनर्जी यांनी महुआ मोईत्रा यांच्या ‘डुक्कर’ या विधानावर टीका केली. त्यांनी म्हटले की, हे त्यांच्या घाणेरड्या वृत्तीचे दर्शन घडवते. जर एखाद्या पुरूषाने एखाद्या महिलेसाठी अशीच टिप्पणी केली असती तर देशात गोंधळ उडाला असता. बॅनर्जी म्हणाले, पुरूषाला ‘लैंगिकदृष्ट्या निराश’ म्हणणे हे धाडसाचे कृत्य नाही.
ते पुढे म्हणाले, जर महुआ मोइत्रा यांना असे वाटत असेल की त्या अपशब्द वापरून लोकशाहीच्या रक्षक बनू शकतात, तर त्या स्वतःला फसवत आहेत. हे महुआ मोइत्रा यांच्यासाठी लाजिरवाणे आहे आणि या देशातील लोक त्यांच्या कृती नक्कीच समजून घेतील.







