उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये ‘आय लव्ह मोहम्मद’चे पोस्टर लावणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई झाल्यानंतर देशभरात मुस्लिम संघटनांकडून “आय लव्ह मोहम्मद” बद्दल कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देशासह राज्यातही आय लव्ह मोहम्मद नामक पोस्टर्स ठिकठिकाणी लावण्यात आल्याचे दिसून आले आहेत. बीडमध्ये तर अशा कार्यक्रमात मौलवीकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
एकीकडे हा वाद सुरु असताना ‘आय लव्ह मोहम्मद’ विरुद्ध ‘आय लव्ह महादेव’ मोहीम सुरु झाली आहे. अनेकजण आय लव्ह महादेवचे स्टेटस ठेवत आहेत, युपीचे तरुण ‘आय लव्ह महादेव’ नावाचा टॅटू हातावर काढून घेत आहेत. अशातच राजकीय नेत्यांनी देखील यात सहभाग घेतला असून मुस्लीम नेत्यांनी ‘आय लव्ह मोहम्मद’ला पाठींबा दिला आहे तर सत्तेतील काही नेत्यांनी हिंदू संघटनांनी याला विरोध केला आहे. असे असताना मंत्री नितेश राणे यांच्या एक्सवरील ‘आय लव्ह महादेव’च्या पोस्टने राज्याचे लक्ष वेधून घेतले. यावरून मोठी चर्चा झाली. त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट केले कि हिंदू राष्ट्रात M फॉर Mahadev च चालणार, बाकी काहीही चालणार नाही.
हे ही वाचा :
मोदी– पुतीन फोनबद्दल चुकीचा दावा करणाऱ्या नाटो सरचिटणीसांना भारताने फटकारले
मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींशी भेट; विविध मुद्द्यांवर चर्चा!
बीडमध्ये मौलवी अशफाक शेखचे वादग्रस्त वक्तव्य : “मुख्यमंत्री योगींना इथेच दफन करेन”
बरेलीत जुम्म्याच्या नमाजानंतर ‘आय लव्ह मोहम्मद’ रॅली, तोडफोड, दगडफेक
आपल्या प्रत्येकाच्या श्वासातच महादेव आहे. त्यामुळे आपल्या हिंदू राष्ट्रात M फॉर Mahadev च चालणार… ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव, असे त्यांनी एक्सवर पोस्टकरत म्हटले. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ही भूमीच महादेवाची आहे. आपल्या प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहेत. हिंदू राष्ट्रामध्ये ‘आय लव्ह महादेव’ नाही लिहणार तर मग काय लिहणार?. एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव, हे सरळ स्पष्ट आहे. मी पाकिस्तान, कराची, इस्लामाबादमध्ये बसून ‘आय लव्ह महादेव’ लिहिलेले नाही, तर हिंदू राष्ट्रामध्ये बसून लिहिलेलं आहे, त्यामुळे यात काहीच चुकीचे नाही.
आपल्या प्रत्येकाच्या श्वासातच महादेव आहे. त्यामुळे आपल्या हिंदू राष्ट्रात M फॉर Mahadev च चालणार…
ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव 🚩🙏#IloveMahadev pic.twitter.com/C4QVNoOzRv— Nitesh Rane (@NiteshNRane) September 26, 2025







