30.4 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरविशेषएम फॉर 'मस्जिद', एन फॉर 'नमाज'...नर्सरी अभ्यास साहित्यावरून वाद!

एम फॉर ‘मस्जिद’, एन फॉर ‘नमाज’…नर्सरी अभ्यास साहित्यावरून वाद!

मध्य प्रदेशातील घटना, अभाविपने केला विरोध 

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील एका खाजगी शाळेने नर्सरीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या अभ्यास साहित्यात के म्हणजे ‘काबा’, एम म्हणजे ‘मस्जिद’, एन म्हणजे नमाज आणि एयू म्हणजे ‘औरत इन हिजाब’ असे शब्द समाविष्ट केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शाळेच्या नर्सरी वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या काकांना वर्णमालेच्या पुस्तकात या गोष्टी आढळून आल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

‘के’ (कबुतर) ऐवजी ‘काबा’, ‘म’ (मासा) ऐवजी ‘मशीद’ आणि ‘न’ (नळ) ऐवजी ‘नमाज’ असा वर्णमालेत उल्लेख करण्यात आला होता. यानंतर कुटुंबीयांनी यावर आक्षेप घेतला आणि अभाविपला कळवले. ही बाब उघडकीस येताच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) सदस्य आणि अनेक पालक शाळेत पोहोचले आणि त्यांनी शिक्षण सामग्रीमध्ये उर्दू आणि इस्लामिक शब्दांचा वापर केल्याबद्दल निषेध केला.

चौकशी केल्यावर, शाळेचे मुख्याध्यापक आय.ए. कुरेशी यांनी कबूल केले की हे साहित्य त्यातील मजकूर तपासल्याशिवाय वितरित करण्यात आले होते. मुख्याध्यापकांनी सांगितले की हे साहित्य भोपाळ येथून आणले गेले होते आणि वादानंतर, सर्व पालकांना ते पुस्तक शाळेत परत करण्यास सांगण्यात आले.

आंदोलनाची माहिती मिळताच कोतवाली पोलिस ठाण्याचे प्रभारी नरेंद्र गोयल शाळेत पोहोचले. त्यांनी परिस्थिती हाताळली आणि निदर्शकांना पोलिस स्टेशन आणि जिल्हा शिक्षण कार्यालयात तक्रारी दाखल करण्याचा सल्ला दिला.

“आम्हाला शाळेत गोंधळ झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर मी पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचलो आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. चौकशी केल्यानंतर, मुख्याध्यापकांनी साहित्य वाटल्याचे कबूल केले. निषेध वाढत असताना, पालक आणि अभाविप सदस्यांना जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करण्याचा सल्ला देण्यात आला,” असे गोयल म्हणाले.

हे ही वाचा : 

निवडणूक आयोगाने फक्त राहुल गांधींशीच चर्चा करावी – आदित्य ठाकरे

जॅकलिन फर्नांडिसचा फिटनेस मंत्र: ‘सर्वात कठीण’ कामाने दिवसाची सुरुवात करा

GeM पोर्टलचा मोठा टप्पा पार – ₹१५ लाख कोटींची खरेदी पूर्ण!

अजूनही पाकिस्तान सावरलेला नाही

या घटनेच्या काही दिवस आधी, समाजवादी पक्षातर्फे चालवल्या जाणाऱ्या पीडीए पाठशाळांमध्ये मुले राजकीय व्यक्तींच्या नावांवरून इंग्रजी वर्णमाला शिकत असल्याचा आणखी एक अहवाल समोर आला होता. “ए फॉर अ‍ॅपल” आणि “बी फॉर बॉल” सारख्या उदाहरणांसह इंग्रजी शिकवण्याच्या पारंपारिक पद्धतीऐवजी, पीडीए पाठशाळा “ए फॉर अखिलेश यादव,” “बी फॉर बाबासाहेब आंबेडकर,” “सी फॉर चौधरी चरण सिंग,” “डी फॉर डिंपल यादव,” आणि “एम फॉर मुलायम सिंग यादव” असे संदर्भ वापर असल्याचे समोर आले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा