31 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरविशेषयोग दिनानिमित्त एम. योगा अ‍ॅपची भारतीयांना भेट

योग दिनानिमित्त एम. योगा अ‍ॅपची भारतीयांना भेट

Google News Follow

आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. विशेष म्हणजे या दिवसाचे आणखीन महत्व वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहायाने एम. योगा हे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप जगभरातील लोकांसाठी असणार आहे. या अ‍ॅपव्दारे आता जगभरातील लोक योगाचे धडे घेऊ शकणार आहेत.

या अ‍ॅपचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील विविध भाषांमध्ये आपण योगा शिकू शकतो. योगा करणे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे, हे संपूर्ण जगाला कळले आहे. कारण कोरोनामध्ये आपल्या शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगा फायदेशीर ठरला. एम. योगा अ‍ॅपची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एम. योगा अ‍ॅपव्दारे जगामध्ये योगाचा प्रसार आणि प्रचार होईल. वन वर्ल्ड वन हेल्थ या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी या अ‍ॅपमुळे मदत मिळेल.

हे ही वाचा:

मोदी सरकार आजपासून सर्व नागरिकांना मोफत लस देणार

कोरोना रुग्णसंख्येचा ८८ दिवसांचा नीचांक

लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायची योगी सरकारची तयारी

हॅाटेल चालकांना परवाना शुल्कात हवी सूट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दर वर्षी २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून राज्यातील २ हजार ७०० पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत असतो. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असल्याने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम झाला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्व लोकांना समजणे आवश्यक आहे. २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.

योगामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अन्य देशांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा