29.8 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरविशेषमहाभारत, अर्थशास्त्र, राजतरंगिणीची युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये नोंद

महाभारत, अर्थशास्त्र, राजतरंगिणीची युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’मध्ये नोंद

भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा

Google News Follow

भारताच्या प्राचीन साहित्यिक, ऐतिहासिक आणि बौद्धिक वारशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे. महाभारत, कौटिल्य अर्थशास्त्र आणि काश्मीरचा इतिहास सांगणाऱ्या राजतरंगिणी या तीन महत्त्वपूर्ण ग्रंथांच्या हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’ आशिया-पॅसिफिक प्रादेशिक नोंदवहीत समावेश करण्यात आला आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथे झालेल्या या नोंदवहीच्या ११व्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. या मान्यतेमुळे या प्रादेशिक नोंदवहीत भारताच्या नोंदींची संख्या सहावर पोहोचली आहे.

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून ही माहिती दिली. भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा, ऐतिहासिक संशोधनाची परंपरा, तत्त्वज्ञान आणि राज्यकारभारविषयक ज्ञानाला मिळालेली ही महत्त्वपूर्ण जागतिक मान्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या तीन ग्रंथांच्या नामांकनाची प्रक्रिया इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने (IGNCA) महत्त्वपूर्ण भूमिका बजावत पूर्ण केली होती.

या तीनही ग्रंथांचे महत्त्व त्यांच्या विषयांबरोबरच ते ज्या दुर्मीळ हस्तलिखितांमधून जतन झाले आहेत, त्यातही आहे. महाभारताचे सुमारे ४०० वर्षे जुने भूर्जपत्रावरील हस्तलिखित पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत जतन करण्यात आले आहे. शारदा लिपीत लिहिलेल्या या हस्तलिखितातील काही भाग आजही संशोधनासाठी महत्त्वाचा मानला जातो.

हे ही वाचा:

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा

हरमीत कौर ढिल्लन यांचा अमेरिकेच्या सहाय्यक ऍटर्नी जनरल पदाचा राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये १,१५० जिलेटिन कांड्या, ९८९ डेटोनेटर्ससह २१ शस्त्रे जप्त

आशुतोष रांका, सौरव दासची गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी

कौटिल्य अर्थशास्त्राचे १६व्या शतकातील ताडपत्रावरील हस्तलिखित म्हैसूर येथील ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये जतन केले आहे. ग्रंथात राज्यकारभार, प्रशासन, अर्थव्यवस्था, करव्यवस्था, परराष्ट्र धोरण, गुप्तचर यंत्रणा आणि युद्धनीती यांचे विवेचन आहे. तर १२व्या शतकातील काश्मिरी इतिहासकार कल्हण यांनी संस्कृतमध्ये लिहिलेली राजतरंगिणी काश्मीरच्या राजांचा इतिहास, राजकीय घडामोडी आणि तत्कालीन सामाजिक जीवनाची माहिती देते. तिचे हस्तलिखित श्रीनगर येथील ओरिएंटल रिसर्च लायब्ररीमध्ये जतन करण्यात आले आहे.

२०२४ मध्ये तीन ग्रंथांचा झाला होता समावेश

यापूर्वी २०२४ मध्ये रामचरितमानस, पंचतंत्र आणि साहित्यशास्त्राशी संबंधित सहृदयालोक-लोचन या ग्रंथांचाही याच प्रादेशिक नोंदवहीत समावेश झाला होता. त्यामुळे आता भारतातील एकूण नोंदींची संख्या सहा झाली आहे. युनेस्कोने १९९२ मध्ये सुरू केलेल्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड’ कार्यक्रमाचा उद्देश ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या महत्त्वाच्या दस्तऐवजांचे जतन करणे आणि ते भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून देणे हा आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा