29.6 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरविशेषमहाराष्ट्रात सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

महाराष्ट्रात सुट्ट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

भेसळखोरांवर एफडीएचा कडक बडगा

Google News Follow

राज्यातील मसाल्यांमधील भेसळ रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर पावले उचलली आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुट्या स्वरूपातील मसाल्यांची विक्री बंद करण्याचे निर्देश दिले असून, मसाल्यांची विक्री उत्पादकाच्या ठिकाणी योग्य पद्धतीने पॅकिंग करून सीलबंद स्वरूपातच करण्यावर भर देण्यात आला आहे. हळद, तिखट, धने, जिरे, गरम मसाला, काळी मिरी यांसह विविध मसाल्यांच्या विक्रीसाठी या नियमांचे पालन करावे लागणार आहे. या निर्णयामुळे किरकोळ विक्रेते, घाऊक व्यापारी आणि मसाले दळणाऱ्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायपद्धतीत आवश्यक बदल करावे लागणार आहेत.
मसाल्यांचा रंग अधिक आकर्षक दिसावा किंवा त्यांचे वजन वाढावे, यासाठी काही ठिकाणी कृत्रिम रंग आणि अन्य पदार्थांची भेसळ केली जात असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. मसाल्यांमध्ये प्रतिबंधित कृत्रिम रंग, विटांची भुकटी, खडूची पूड, लाकडाचा भुसा किंवा इतर अनधिकृत पदार्थ मिसळणे हा अन्नसुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रकार आहे. अशा भेसळयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मसाल्यांची शुद्धता, गुणवत्ता आणि सुरक्षितता राखण्यासाठी उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
मशिदींचे कारण देत आरएसएसचे संचलन रोखता येणार नाही

झिम्बाब्वेविरुद्ध स्मृतीची विक्रमी खेळी होणार?

भुवनेश्वर कुमारची संघात एन्ट्री!

वर्सोवा समुद्रकिनारी गोणीत सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले
मसाल्यांचे उत्पादन, दळण आणि साठवणूक करताना स्वच्छतेचे नियम पाळणेही बंधनकारक असेल. मसाले रस्त्यांवर, गटारांच्या परिसरात, कचऱ्याजवळ किंवा अस्वच्छ ठिकाणी वाळवण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्पादन आणि साठवणुकीची ठिकाणे स्वच्छ, कोरडी आणि कीटकमुक्त असणे आवश्यक आहे. तसेच मसाले उत्पादक आणि संबंधित व्यावसायिकांकडे त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (एफएसएसएआय) वैध परवाना किंवा नोंदणी असणे गरजेचे आहे. मसाल्यांच्या पाकिटांवर उत्पादनाचे नाव, घटक पदार्थ, उत्पादकाची माहिती, परवाना क्रमांक आणि आवश्यक दिनांकविषयक तपशील नमूद करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून मसाले उत्पादक आणि विक्रेत्यांची तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन किंवा भेसळ आढळल्यास संबंधित उत्पादन जप्त करणे, विक्रीवर निर्बंध आणणे, परवाना निलंबित किंवा रद्द करणे आणि नियमानुसार कायदेशीर कारवाई करणे यांसारख्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात. या निर्णयामुळे मसाल्यांच्या बाजारपेठेतील अनियंत्रित विक्रीवर नियंत्रण येण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांनीही मसाले खरेदी करताना पॅकबंद उत्पादनाला प्राधान्य देऊन त्यावरील परवाना क्रमांक, उत्पादनाची माहिती आणि मुदत तपासावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा