30 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरविशेषपेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड

पेपरफुटी करणाऱ्यांवर आता १० कोटींचा दंड

मालमत्ताही होणार जप्त

Google News Follow

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. पेपरफुटी करणाऱ्यांना केवळ तुरुंगवासाची शिक्षा न देता आर्थिकदृष्ट्याही मोठा दणका देण्याची शिफारस स्पर्धा परीक्षा सुधारणा समितीने केली आहे. समितीच्या दुसऱ्या अहवालात दोषींना सात ते दहा वर्षांपर्यंत कारावास, किमान १० कोटी रुपयांचा दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

परीक्षांमधील गैरप्रकारांचा तपास प्रभावीपणे करण्यासाठी विशेष कृती दल अर्थात एसटीएफ स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तसेच अशा प्रकरणांचा जलदगतीने निकाल लावण्यासाठी विशेष न्यायालये सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र परीक्षा शाखा स्थापन करणे, परीक्षा केंद्रांची निवड जिल्हा प्रशासनामार्फत करणे आणि परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणे अशा उपाययोजनांचाही अहवालात समावेश आहे. यामुळे परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हे ही वाचा:
रशिया-युक्रेन युद्धात ४.९० लाखांहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू

भारताचा आर्थिक विकासदर सलग दोन वर्षे ७ टक्क्यांवर राहणार

लघुउद्योगांच्या व्यवसायाची दुसऱ्या तिमाहीत १८.८ टक्क्यांची दमदार वाढ

स्वयंपाकघरातील तेलाला महागाईचा ‘तडका’

उमेदवारांच्या हिताचाही समितीने विचार केला आहे. एमपीएससी परीक्षेचे संपूर्ण शुल्क परत करण्याची तसेच उत्तरतालिकेवरील हरकत योग्य ठरल्यास हरकत शुल्क परत देण्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय पुढील वर्षाचे वार्षिक परीक्षा वेळापत्रक ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्याचा प्रस्ताव आहे. परीक्षा प्रक्रियेतील सायबर सुरक्षेला प्राधान्य देत स्वतंत्र सायबर सुरक्षा कक्ष आणि तंत्रज्ञानाधारित नियंत्रण व्यवस्था उभारण्यावरही भर देण्यात आला आहे.

दरम्यान, २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या औषध निरीक्षक पदभरती परीक्षेतील पेपरफुटीच्या आरोपांमुळे एमपीएससीच्या परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. १५४ पदांसाठी घेण्यात आलेली ही भरती प्रक्रिया आयोगाने २५ ऑगस्ट रोजी रद्द केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ४ सप्टेंबर रोजी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय सुधारणा समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या नव्या अहवालामुळे परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, या शिफारशींची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतरच स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा दृढ होऊ शकणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा