दोन ते तीन वर्ष जुने मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेलेे दोन स्मारक सुरक्षा दलातील जवानांनी केले नष्ट केले, अशी माहिती गडचिरोली पोलीसांनी एक्सवर पोस्टकरत दिली. या स्मारकाच्या ठिकाणी वृक्षारोपण करीत पोलीस दलाने शांतता व सुरक्षेचा संदेशही दिला. कारवाई करतानाचे फोटोही पोलिसांनी पोस्ट केले आहेत.
यासह भामरागड तालुक्यातील पोस्टे कोठी हद्दीतील मौजा मरकणार येथील ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गडचिरोली पोलिसांनी म्हटले, ग्रामस्थांनी ०१ भरमार बंदूक पोलिसांकडे सुपूर्द केली. जानेवारी २०२४ पासून अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील एकूण ४० गावांनी माओवादींच्या विरोधात ‘गावबंदी’ जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच पोलिसांनी रेकी करणाऱ्या एका नक्षल समर्थकास अटकही केली. गडचिरोली पोलिसांनी एक्सवर पोस्टकरत म्हटले, भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाया नक्षल समर्थकास गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने अटक केली. ३० सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोस्टे कटेझरी हद्दीतील माओवादी स्मारक गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट
दोन ते तीन वर्ष जुने मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेलेे दोन स्मारक सुरक्षा दलातील जवानांनी केले नष्ट
स्मारकाच्या ठिकाणी वृक्षारोपण करीत पोलीस दलाने दिला शांतता व सुरक्षेचा संदेश… pic.twitter.com/IPyBEYr2qG— गडचिरोली पोलीस – GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) October 1, 2025
भामरागड तालुक्यातील पोस्टे कोठी हद्दीतील मौजा मरकणार येथील ग्रामस्थांनी केली माओवाद्यांना गावबंदी
ग्रामस्थांनी 01 भरमार बंदुक पोलीसांना केली सुपूर्द
जानेवारी 2024 पासून अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील एकूण 40 गावांनी केली माओवाद्यांना गावबंदी#GadchiroliPolice #गावबंदी… pic.twitter.com/ZkaZXnGuuk— गडचिरोली पोलीस – GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) October 1, 2025
भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणाया नक्षल समर्थकास गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने केली अटक
सुरक्षा दलांविरुद्धच्या हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका नक्षल समर्थकास काल दिनांक 30/09/2025 रोजी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने अटक केली आहे… pic.twitter.com/POeTp9rHNJ— गडचिरोली पोलीस – GADCHIROLI POLICE (@SP_GADCHIROLI) October 1, 2025







