मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाबाबत आता एक मोठा राजकीय आणि तपासाशी संबंधित ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेले तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत आणि म्हटले आहे की त्यावेळी त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. मुजावर यांनी दावा केला की तत्कालीन मुख्य तपास अधिकारी परमबीर सिंग यांनी त्यांना मोहन भागवत यांना अटक करण्याचे निर्देश दिले होते. ते म्हणतात की “भगवा दहशतवादाचा जो सिद्धांत रचला गेला होता तो पूर्णपणे खोटा होता.”
माजी निरीक्षक मेहबूब मुजावर म्हणाले की, “त्यांनी मला मृतांना जिवंत दाखवणारे आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले. जेव्हा मी नकार दिला तेव्हा तत्कालीन आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांनी मला खोट्या प्रकरणात अडकवले… मी निषेध केला कारण मला खोटे काम करायचे नव्हते आणि परिणामी, माझ्यावर बनावट खटले दाखल करण्यात आले. त्या सर्वांतून मला निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.”
त्यांनी असेही म्हटले की त्यावेळी त्यांना काही गोपनीय माहिती मिळाली होती, ज्यामुळे त्यांना भीती होती की हा खटला राजकीय दबावाखाली येऊ शकतो, म्हणूनच ते आतापर्यंत मौन राहिले. मुजावर म्हणाले, “भगवा दहशतवाद असो किंवा हिरवा दहशतवाद, माझा कोणाशीही काहीही संबंध नव्हता. मी फक्त माझे कर्तव्य करत होतो.”
हे ही वाचा :
Ganpati Special Train: एलटीटी – मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन
रुग्णालयात उंदराने रुग्णाला कुरतडलं
‘हिंदू कधीही आतंकवादी होऊ शकत नाही, आतंकवाद-जिहादचा रंग हिरवा’
परभणीत भाजपाची नवी महानगर कार्यकारिणी सज्ज!
दरम्यान, अनेक वर्षांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना आता निर्दोष सोडण्यात आले आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रकरणावर नवीन प्रश्न उपस्थित झाले आहेत. मेहबूब मुजावर यांच्या ताज्या विधानामुळे आता तपास यंत्रणा आणि राजकीय नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी सरकारचा सगळाच कच्च्याचिठ्ठा आता उघड झाला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये तत्कालीन सरकार आपला अजेंडा राबवत होते. हिंदूंना बदनाम करण्यासाठी हे सगळं कारस्थान रचण्यात आलं होतं आता यांची चौकशी करण्याची गरज आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी सरकारचा सगळाच कच्च्याचिठ्ठा आता उघड झाला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये तत्कालीन सरकार आपला अजेंडा राबवत होते. हिंदूंना बदनाम करण्यासाठी हे सगळं कारस्थान रचण्यात आलं होतं आता यांची चौकशी करण्याची गरज आहे. https://t.co/s2wMGWoSQi
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 1, 2025







