२००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज अखेर निकाल लागला. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयाने निकाल देत साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांच्यासह सर्व ७ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी या प्रकरणात निकाल दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर विविध नेत्यांच्या आणि लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याच दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘दहशतवाद ना कधी भगवा होता, ना आहे, ना कधी राहणार’, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, “केवळ संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही,” असे कोर्टाने सांगत सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
हे ही वाचा :
आतंकवाद कधीच भगवा नव्हता, नाही आणि कधीच होणार नाही
एसबीके सिंह दिल्लीचे नवे पोलिस आयुक्त
हिंदूंच्या विरोधात रचलेली कारस्थान उघडकीस
अटल ब्रिजबद्दल उमर अब्दुल्ला काय म्हणाले ?
आतंकवाद भगवा न कभी था, ना है, ना कभी रहेगा!#MalegaonVerdict
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 31, 2025
सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं…
कोर्टाच्या निकालानंतर भाजपा महिला आमदार चित्रा वाघ म्हणाल्या, आज मालेगाव बॉम्बब्लास्ट प्रकरणातील सर्व ७ आरोपींना कोर्टाने निर्दोष घोषित केलं. ही केवळ एक न्यायालयीन निकालाची बातमी नाही, तर काँग्रेसच्या विषारी आणि विखारी राजकारणाचा चेहरा पुन्हा उघड झाला आहे. त्यांच्या मोहोब्बतच्या दुकानात तुष्टीकरणाच्या , द्वेषाच्या गोळ्या मिळतात हे चव्हाट्यावर आलं आहे.
हिंदू साध्वींना, राष्ट्रासाठी लढणाऱ्या अधिकाऱ्यांना खोट्या पुराव्यांत अडकवण्यात आलं. का? एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी? का विशिष्ट लोकांची पापं लपवण्यासासाठी…?
‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द प्रचारात आणणाऱ्यांनी देशाच्या सामाजिक ऐक्यालाच गालबोट लावणाऱ्या काँग्रेसला आज कायद्याचा दणका मिळाला आहे. आज या विकृत कॉंग्रेसला संविधानाचा खरा अर्थ समजेल …कारण संविधानाच्या आधारावरच सत्याचा विजय झाला आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.







