पवईत घडलेल्या धक्कादायक ओलीस प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (३१ ऑक्टोबर) जखमी मंगल जगन्नाथ पाटणकर यांच्याशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आणि त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच ओलीस ठेवण्यात आलेल्या लहान मुलीशीही त्यांनी संवाद साधून तिला धीर दिला.
कालच्या थरारक घटनेत संशयिताने परिसरातील लहान मुलांना ओलीस ठेवून दहशत निर्माण केली होती. यावेळी मंगल पाटणकर यांनी प्रसंगावधान राखत वेळीच पोलिसांना माहिती दिली आणि त्याचबरोबर १७ लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढत मोठा अनर्थ टाळला. त्यांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे पोलिसांना तात्काळ कारवाई करता आली आणि संपूर्ण घटनाक्रमावर नियंत्रण मिळवता आले.
हे ही वाचा :
बिहार: पंतप्रधान मोदींनी ‘गमछा’ फिरवला, ‘मोदी-मोदी’च्या घोषणेने परिसर दुमदुमला!
संजय राऊत प्रकृतीच्या कारणास्तव दोन महिने सार्वजनिक जीवनातून बाहेर
शिवम दुबेचा अजेय रेकॉर्ड तुटला!
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी२०मध्ये भारतावर ४ विकेटने मात केली
“मंगल पाटणकर यांच्या धाडसामुळे आणि जागरूकतेमुळे अनेक लहान मुलांचे जीव वाचले. समाज अशा नागरिकांमुळे सुरक्षित राहतो,” असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.







