मैतेईंच्या ‘अरांबाई टेंगोल’ संघटनेकडून २४६ शस्त्रे समर्पित

राज्यपालांनी सात दिवसांचा दिला होता अल्टीमेट 

मैतेईंच्या ‘अरांबाई टेंगोल’ संघटनेकडून २४६ शस्त्रे समर्पित

मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ‘अरांबाई टेंगोल’ या मैतेई संघटनेच्या सदस्यांनी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) आपले शस्त्र समर्पण केले. जवळपास २४६ शस्त्रे त्यानी सोपवली. गुरुवार हा शस्त्रे सोपवण्याचा अखेरचा दिवस होता.

२५ फेब्रुवारी रोजी राज्यपालांनी ‘अरांबाई टेंगोल’च्या नेत्यांची भेट घेतली होती. बेकायदेशीर शस्त्रे परत करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच शस्त्रे समर्पण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची हमी राज्यपालांनी दिली होती. आज अखेर ‘अरांबाई टेंगोल’ संघटनेकडून शस्त्रे समर्पण करण्यात आली आहेत.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्यपालांच्या बैठकीनंतर जनसंपर्क अधिकारी रॉबिन मंगांग यांनी सांगितले की, बैठक सकारात्मक होती. राज्यपालांनी नेत्यांना बेकादेशीर शस्त्रे परत करण्याची विनंती केली. मात्र, संघटनेच्या नेत्यांनी काही अटी आणि शर्ती घातल्या आहेत, या अटी-शर्ती पूर्ण झाल्यानंतर शस्त्रे परत केली जाणार असल्याचे नेत्यांनी म्हटले. दरम्यान, अखेर बैठकीनंतर ‘अरांबाई टेंगोल’ संघटनेकडून शस्त्रे आणि दारुगोळा पोलिसांना परत केला.

राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी २० फेब्रुवारी रोजी एक आदेश जारी करत राज्यातील सर्व समुदायातील लोकांना सात दिवसांच्या आत लुटलेली बेकायदेशीर शस्त्रे परत करण्याचे आवाहन केले होते. सात दिवसात शस्त्रे परत न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचे राज्यपालांनी म्हटले होते. राज्यपालांच्या आदेशानंतर संघटना आणि व्यक्ती त्यांच्याकडील शस्त्रे आणि दारुगोळा पोलिसांकडे जमा करत होते.

हे ही वाचा : 

सद्गुरूंना काँग्रेसचे डी. के. शिवकुमार भेटले, काँग्रेसचा झाला तीळपापड

महाशिवरात्रीच्या मिरवणुकीत बजरंग दलाकडून ‘लव्ह जिहाद’ थीमवर चित्ररथ

मुंबईत कसा सुरू आहे ‘हाऊसिंग जिहाद’?

उबाठाच्या संजय राऊतांविरोधात शिवसेना महिला आघाडीने उगारले ‘जोडे’

दरम्यान, ३ मे २०२३ रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून, बिष्णुपूर आणि चुराचंदपूरच्या सीमेवर असलेल्या तोरबांग या गावात काही बदमाश हातामध्ये रायफल्स घेवून निदर्शने करताना दिसले होते, तेव्हापासून मोठ्या जमावाने राज्यातील शस्त्रागार, पोलिस ठाणी, चौक्या आणि इतर सुविधांमधून शस्त्रे लुटली. आतापर्यंत ६,००० हून अधिक शस्त्रे लुटण्यात आली आहेत आणि तर सुमारे २,५०० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

 

Exit mobile version