विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हेंविरोधात अवमानजनक भाष्य करणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊतविरोधात शिवसेना महिला आघाडीकडून आज (२७ फेब्रुवारी) जोडे मारा आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्या नेतृत्वात पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन येथे महिलांनी राऊत विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
उबाठा खासदार संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारुन महिलांनी निषेध केला. संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर, कंगणा राणावत, नवनीत राणा यांना वाईट बोलून अपमान केला. राजकारणात टीका करताना राऊतांनी भाषा नीट वापरावी. नाहीच सुधारले तर आज फक्त बॅनरला जोडे मारले आहेत पुढच्या वेळी तोंडावर चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत, असा सज्जड इशारा शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी दिला.
यावेळी हातामध्ये भगवे झेंडे घेत महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘महिला सेनासे जो टकरायेगा मिट्टी में मिल जायेगा,’ ‘जिंदा बाद-जिंदा बाद महिला सेना जिंदा बाद’ अशा घोषणा देवून शिवसेनेच्या महिलांनी निषेध दर्शविला. या आंदोलनात शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रेसह मुंबईतील सर्व महिला पदाधिकारी सहभागी होत्या. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या विधानाचा शिवसेना शिंदे गटासह महायुतीच्या नेत्यांनीही निषेध केला आहे.
हे ही वाचा :
महाकुंभमध्ये आलेल्या ६६ कोटी भाविकांची गणना कशी केली?
बांगलादेश: हिंदूंच्या घराची तोडफोड, अतिथंडीमुळे महिलेचा मृत्यू!
महाकुंभाची समाप्ती, मुख्यमंत्री प्रयागराजमध्ये दाखल, गंगा पूजेत सहभागी!