४५ दिवसांच्या महाकुंभाच्या समारोपाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रयागराजला पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, केपी मौर्य आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांनी प्रयागराजमधील अरैल घाटावर गंगेची पूजा केली. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करत संगम घाटावर स्वच्छता केली. पूजेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर्व घाटांची पाहणी करत आहेत.
१३ जानेवारी रोजी सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्याची समाप्ती काल म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी झाली. महाकुंभ मेळ्यातील शेवटचे महाशिवरात्रीचे अमृत स्नान असल्याकारणाने लाखो भक्त घाटांवर दिसून आले. महाकुंभ मेळ्याच्या ४५ दिवसात तब्बल ६६ कोटी ३० लाख भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमात स्नान केले. विशेष म्हणजे, भाविकांची ही संख्या चीन आणि भारत वगळता अमेरिका, रशिया आणि युरोपीय देशांसह सर्व देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
देशासह, जगभरात महाकुंभ मेळ्याची चर्चा झाली. परदेशातील अनेक नागरिक महाकुंभ मेळ्यात सहभागी होत आनंद व्यक्त केला. महाकुंभ मेळ्यामध्ये अनेकांना रोजगार मिळाले तर अनेकांचे नशीबही चमकले. महाकुंभ मेळ्यात एक तरुण दातून विकून दिवसातून चार-पाच हजार रुपये कमावत होता. तर महाकुंभ मेळ्यात मोत्यांचे हार विकण्यासाठी आलेल्या मोनालिसा नामक तरुणी आपल्या सुंदर डोळ्यांमुळे आणि रुपामुळे तिला थेट चित्रपटाची ऑफर मिळाली.
हे ही वाचा :
अॅड. साळवी यांच्या ‘कॉमेंट्री ऑन पॉक्सो’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपीवर एक लाखांचे बक्षीस जाहीर!
महाकुंभ- एकतेचा महायज्ञ संपन्न झाला; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना
हमासकडून युद्धबंदी कराराअंतर्गत चार ओलिसांचे मृतदेह सुपूर्द
संगमात स्नान करण्यासाठी ‘डिजिटल स्नाना’चीही बरीच चर्चा झाली. एखाद्या व्यक्तीला संगमात स्नान करता येत नसेल तर त्या व्यक्तीच्या फोटोची प्रिंट काढून तो संगमात बुडवला जायचा, म्हणजे संगमात त्याने स्नान केले असे होते. या ‘डिजिटल स्नाना’मुळे एका तरुणाला रोजगार मिळाला.
अनेकांनी दानधर्म म्हणून महाकुंभात निष्काम सेवा केली, प्रसादाचे वाटप केले. याच दरम्यान, १२ वीमध्ये शिकणाऱ्या साहिल नावाच्या मुलाची महाकुंभमुळे देशभरात चर्चा झाली. महाकुंभ मेळ्यात येणाऱ्या सर्व महिलांना साहिल मोफत चहाचे वाटप करत असे. साहिलच्या आईचे निधन झाल्यामुळे महाकुंभात येणाऱ्या प्रत्येक महिलेमध्ये तो त्याच्या आईला पाहत असल्याने महिलांना मोफत चहा देत असल्याचे त्याने सांगितले.