अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात समाजात जागृती व्हावी. या संदर्भात असणारे कायदे सहज, सोप्या आणि सुटसुटीतपणे लोकांना समजावेत या उद्देशाने उच्च न्यायालयाचे वकील अॅड. प्रफुल साळवी यांनी लिहिलेल्या ‘कॉमेंट्री ऑन पॉक्सो’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा..
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपीवर एक लाखांचे बक्षीस जाहीर!
महाकुंभ- एकतेचा महायज्ञ संपन्न झाला; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना
डॉ. सुनील देवधर यांच्या उपस्थितीत रिडीफायनिंग एम्प्लॉयमेंट २०२५ चे आयोजन
हमासकडून युद्धबंदी कराराअंतर्गत चार ओलिसांचे मृतदेह सुपूर्द
यावेळी बोलताना कुलगुरू कुलकर्णी म्हणाले, समाजात अल्पवयीन मुलांवर होणारे अत्याचार आणि त्या संदर्भात असणारे कायदे समजावेत. अन्यायग्रस्त मुलांच्या पालकांची या पुस्तकाच्या माध्यमातून जागृती होण्यास मदत होईल. प्रॅक्टिसमध्ये असणाऱ्या वकिलांनी अशा पद्धतीने लिखाण करायला हवे. अॅड. साळवी यांनी लिहिलेले हे पुस्तक समाजासाठी जास्त उपयुक्त ठरेल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. प्रकाशनावेळी डॉ.श्वेताली पाटील, साहू साबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.