कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख आध्यात्मिक नेते सद्गुरू यांनी आयोजित केलेल्या महाशिवरात्री कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. त्यांनी दिलेल्या आमंत्रणाबद्दल डी के शिवकुमार यांनी सद्गुरू यांचे आभार मानले. मात्र, यानंतर डी के शिवकुमार यांच्यावर काँग्रेस पक्षातूनचं टीका केली जात आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) सचिव पीव्ही मोहन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये आपली डी के शिवकुमार यांच्या पोस्टवर नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, शिवकुमार यांच्या कृतीमुळे पक्षाच्या गाभ्याला नुकसान होत आहे. तसेच राहुल गांधींची खिल्ली उडवणाऱ्या व्यक्तीचे ते आभार कसे मानू शकतात असा सवाल त्यांनी विचारला आहे. महाशिवरात्री साजरी करण्यासाठी कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्रात आमंत्रित केल्याबद्दल शिवकुमार यांनी पोस्ट केलेल्या आभार पत्राचा उल्लेख मोहन करत होते.
Thanking for an invitation from someone who mocks RG, the hope of the nation&aligns with RSS’s narratives,while serving as a president of a secular party, it misleads party workers. It is Conviction rather than compromise ensures the party’s growth. Otherwise, it damages the core pic.twitter.com/x9hnxhbfF6
— PV.MOHAN (@pvmohanINC) February 26, 2025
हे ही वाचा :
मुंबईत कसा सुरू आहे ‘हाऊसिंग जिहाद’?
उबाठाच्या संजय राऊतांविरोधात शिवसेना महिला आघाडीने उगारले ‘जोडे’
महाकुंभमध्ये आलेल्या ६६ कोटी भाविकांची गणना कशी केली?
बांगलादेश: हिंदूंच्या घराची तोडफोड, अतिथंडीमुळे महिलेचा मृत्यू!
शिवकुमार यांनी ईशा योग केंद्रातील त्यांच्या अनुभवाबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे तसेच त्यांनी सद्गुरूंना धन्यवाद म्हणत आमंत्रण पत्रिकेचा फोटो पोस्ट केला होता. त्यावर पीव्ही मोहन म्हणाले की, “मी टीका करत नसून केवळ शिवकुमार यांच्या वैचारिक मार्गांबद्दल मत व्यक्त करत होतो. ईशा फाउंडेशन आणि जग्गी वासुदेव यांच्या विचारसरणी भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीशी जुळतात. आम्ही आरएसएसच्या विचारसरणीच्या पूर्णपणे विरोधात आहोत आणि राहुल यांनी वारंवार सांगितले आहे की जो कोणी आरएसएसच्या विचारसरणीचे पालन करतो तो पक्ष सोडू शकतो,” असे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी हे देखील पुढे स्पष्ट केले की, शिवकुमार यांच्या मंदिर भेटीला कोणताही आक्षेप नसला तरी, केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कृतीतून पक्षाच्या मूल्यांचे चांगले प्रतिबिंब पडायला हवे.