आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मन की बात’ पुढील तीन महिने प्रसारित केली जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी आज ११० व्या कार्यक्रमात देशाला संबोधित करताना सांगितले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा ११० वा भाग सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात आला. हा त्यांचा वर्षातील दुसरा कार्यक्रम होता. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केला जातो.
या कार्यक्रमाची सुरुवात ३ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती. भारतीय समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना समाविष्ट करून विविध घटकांशी जोडणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे सरकारी उपक्रम, धोरणे आणि कल्याणकारी योजनांची माहिती प्रसारित करतात. २२ स्थानिक भाषा तसेच फ्रेंच, नी, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मी, बलुची, अरबी, पश्तू, पर्शियन, दारी आणि स्वाहिली यासह ११ परदेशी भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाचा प्रभाव लोकांच्या जीवनावर झाला असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. १०० कोटी पेक्षा जास्त लोक मन कि बात या कार्यक्रमाशी एकदा तरी जोडले गेले आहेत.
हेही वाचा..
राष्ट्रध्वजाला म्हटले ‘सैतानी’; फ्रान्सने केले मुस्लिम धर्मगुरूला हद्दपार
अशोक चव्हाण कामाला लागले; तब्बल ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश!
विमान जमिनीवर उतरताना पायलटच्या डोळ्यांत शिरली लेझर किरणे
दंगलीत नुकसान करणाऱ्या बदमाशांकडून वसुलीसाठी कायदा!
११० व्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील महिला शक्ती प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या नवनवीन शिखरांना स्पर्श करत आहेत. काही दिवसांनी ८ मार्च आपण महिला दिन साजरा करू. हा विशेष दिवस म्हणजे देशाच्या विकासाच्या प्रवाहात महिला शक्तीच्या योगदानाला सलाम करण्याची संधी आहे. महिलांना समान संधी मिळाल्यावरच जग समृद्ध होईल,असे महान कवी भरथियार जी यांनी म्हटले असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी सुरु केलेल्या ‘नमो ड्रोन दीदी’ योजनेवरही प्रकाश टाकला आणि या उपक्रमाने ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांच्या जीवनात बदल घडवून आणल्याचे सांगितले.
“काही वर्षांपूर्वीपर्यंत कोणी विचार केला असेल की आपल्या देशात खेड्यात राहणाऱ्या महिलाही ड्रोन उडवतील? पण आज हे शक्य होत आहे.आज प्रत्येक गावात ड्रोन दीदीची खूप चर्चा आहे, नमो ड्रोन दीदी, नमो ड्रोन दीदी प्रत्येकाच्या ओठावर आहे. प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलत आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली. तेव्हापासून, आयएफएफसीओ व्यतिरिक्त, अनेक खत कंपन्या ‘लखपती दीदी’ सारख्या बचत गट योजनांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सक्षम करण्यासाठी पुढे आल्या असल्याचेही ते म्हणाले.