29 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
घरविशेषगर्भवती मुलीशी लग्न करून तिहेरी तलाख दिला !

गर्भवती मुलीशी लग्न करून तिहेरी तलाख दिला !

Google News Follow

Related

उत्तर-पूर्व दिल्लीतील दयालपूर परिसरात एका १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. शवेझ आलम असे संशयीताचे नाव आहे.त्याच्या गुन्हेगारी कृत्याचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याने पिडीत मुलीशी लग्न केले. मात्र जेव्हा तिने त्याच्यासोबत जाण्यासाठी आग्रह धरला तेव्हा त्याने तिला तिहेरी तलाक दिला आहे.
या प्रकरणातील पिडीत मुलगी गेल्या दोन वर्षापासून मुस्तफाबाद परिसरात राहत होती. तिच्या वडिलांचे २०२१ मध्ये निधन झाले आहे.तिची आई देखील आजारी असते. पीडीतेने सांगितले की, गेल्या वर्षी शेजारच्या प्रॉपर्टी डीलरने तिच्या कुटुंबाला भाड्याने घर मिळवून दिले होते. यानंतर आरोपी शवेज आलम त्यांच्या घरी येऊ लागला. १४ ऑगस्ट २०२३ रोजी मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी शवेज याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिने कोणाला काही सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिली, असा आरोप आहे.

हेही वाचा..

रशिया-युक्रेन युद्धात हैदराबादच्या तरुणाचा मृत्यू!

पंतप्रधानांची दक्षिण मोहीम; भाजपला ३० जागा मिळण्याची शक्यता

हा कसला राजा हा तर भिकारी!

मलाही मुसेवाला-नफेसिंगप्रमाणे मारतील!

अल्पवयीन पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी १४ ऑगस्ट २०२३ पासून धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. त्यानंतरही हा प्रकार सुरूच होता. त्यानंतर ती नोव्हेंबरमध्ये गर्भवती राहिली. गरोदर असल्याचे समजताच तिने शेवेजला माहिती दिली मात्र त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन बाळाचा गर्भपात केला. अल्पवयीन पीडितेने फिर्याद दिली, मी पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीने मला आणि माझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी तिला हार्मोन बदलणाऱ्या गोळ्या दिल्या होत्या. अल्पवयीन पीडितेच्या आईला तिच्या मुलीकडून अत्याचार आणि गर्भधारणेची माहिती मिळाल्यावर तिने आरोपीचा सामना केला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपीने पीडितेच्या कुटुंबाला पटवून दिले आणि १७ नोव्हेंबर रोजी अल्पवयीन पीडितेशी “लग्न” केले, परंतु त्याने तिला घरी नेण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीने तिला घरी नेण्यास सांगितल्यावर आरोपी आलम याने तिच्यावर शारिरीक अत्याचार केला आणि २१ जानेवारी रोजी तिची सुटका करण्यासाठी तिहेरी तलाक दिला.

पीडितेच्या कुटुंबीयांनी महिला हेल्पलाइनवर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. शनिवार, २ मार्च रोजी अल्पवयीन पीडितेचे जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी शवेज आलम याला बलात्कार, पोक्सो, जबरदस्ती गर्भपात, जीवे मारण्याची धमकी आदी आरोपाखाली ताब्यात घेतले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
146,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा