29.9 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरविशेषपंजाबमध्ये ड्रग्सविरोधात लोकांचा संताप.... मारेकऱ्याचे दुकान जाळले, घरावर बुलडोझर

पंजाबमध्ये ड्रग्सविरोधात लोकांचा संताप…. मारेकऱ्याचे दुकान जाळले, घरावर बुलडोझर

Google News Follow

पंजाबमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या झाल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मानसा येथे मंगळवारी झालेल्या या हत्येनंतर मोठा जनक्षोभ निर्माण झाला. त्यानंतर प्रशासनाने झोटा यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या अश्वनी कुमार या मेडिकल स्टोअर मालकाच्या घरातील कथित बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करत ती बांधकामे पाडली. दुसरीकडे, संतप्त जमावाने कुमार यांच्या मेडिकल स्टोअरला आग लावली.

दरम्यान, हत्या केल्यानंतर फरार झालेल्या अश्वनी कुमारला बुधवारी राजस्थानातील सालासर येथून पोलिसांनी अटक केली. मानसा येथील मेडिकल स्टोअरमध्ये अमली पदार्थांची कथित बेकायदेशीर विक्री होत असल्याच्या आरोपावरून झोटा आणि कुमार यांच्यात वाद झाला होता. याच वादादरम्यान कुमारने झोटा यांच्यावर गोळीबार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मानसाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव चौधरी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, प्रशासनाकडून कथित बेकायदेशीर बांधकामाविरोधात कारवाई सुरू असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हे ही वाचा:

टाटा ट्रस्ट्समधील वाद न्यायालयात

एआयचा फुगा फुटेल…अमेरिकन बाजाराला फटका बसेल

दुग्धालयात राहुल गांधींना हवाय खिमा पाव…

फ्लायदुबई कटात सामील असल्यावरून मालदीवचे दोन वैमानिक ताब्यात

कॅमेऱ्यासमोर वाद, त्यानंतर गोळीबार

झोटा हे पंजाबमधील अमली पदार्थांच्या वाढत्या वापराविरोधात सातत्याने आवाज उठवत होते. मेडिकल स्टोअरमधून अमली पदार्थांची कथित बेकायदेशीर विक्री होत असल्याबाबतही ते प्रश्न उपस्थित करत होते. एका व्यक्तीला काही विशिष्ट औषधे विकल्याच्या आरोपावरून झोटा यांनी आपल्या समर्थकांसह अश्वनी कुमार यांच्याकडे जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.

ऑनलाइन समोर आलेल्या ५ मिनिटे ४९ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये झोटा हे मेडिकल स्टोअर मालकाने पिस्तूल काढल्याचे सांगताना ऐकू येतात. त्यानंतर त्यांनी कुमार यांना गोळी झाडण्याचे आव्हान दिल्याचेही व्हिडिओमध्ये ऐकू येते. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये कुमार हातात शस्त्र घेऊन दुकानातून बाहेर येताना आणि जीव वाचवण्यासाठी धावणाऱ्या झोटा यांचा पाठलाग करताना दिसतो. त्यानंतर झोटा हे जवळच्या एका दुकानात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या हत्येनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या सरकारवर कायदा आणि सुव्यवस्था तसेच सरकारच्या ‘युद्ध नशियां विरुद्ध’ या अमली पदार्थविरोधी मोहिमेवरून विरोधकांनी जोरदार टीका केली. काँग्रेस नेते अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी झोटा यांच्या हत्येचा निषेध केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा