24 C
Mumbai
Tuesday, January 27, 2026
घरविशेषयूएपीए अंतर्गत कैद झालेल्या कैद्यांची सुटका करा!

यूएपीए अंतर्गत कैद झालेल्या कैद्यांची सुटका करा!

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींची मागणी

Google News Follow

Related

जम्मू आणि कश्मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (PDP) अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज (२५ ऑगस्ट) केंद्र सरकारकडे यूएपीए (UAPA) कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या निष्पाप कैद्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी केली. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “‘आम्हाला आज आंदोलन करायचं होतं, अशा लोकांसाठी जे निष्पाप असूनही यूएपीए अंतर्गत तुरुंगात टाकले गेले आहेत. विशेषतः त्यांचे पालक एवढे सक्षम नाहीत की ते न्यायासाठी लढू शकतील.'”

मेहबूबा मुफ्ती यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांच्यावरही जबाबदारी सोपवत सांगितले की, “त्यांनी गृहमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करावी. जर कैद्यांची सुटका शक्य नसेल, तर किमान त्यांना जम्मू आणि कश्मीरमधील तुरुंगातच ठेवावं, जेणेकरून त्यांचे कुटुंबीय त्यांची काळजी घेऊ शकतील.”

“गरीब लोकांना कोर्टात खटला चालवणं शक्य नाही. ते आजारी असतील तर त्यांची काळजी कोण घेणार? तुरुंगात त्यांच्या अडचणी कोण ऐकून घेणार? ही बाब राजकारणाची नाही, ही माणुसकीची आहे,” असे मुफ्ती म्हणाल्या.

हे ही वाचा : 

अमित साटम भाजपचे नवे मुंबई अध्यक्ष!

काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित!

पंतप्रधान मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर चाकूने हल्ला करण्याची आरोपीची योजना, पण…

दरम्यान, UAPA कायद्याअंतर्गत जम्मू-कश्मीरमधील अनेक तरुणांना ‘दहशतवादाशी संबंधित’ आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये अटक झालेल्यांवर आरोप सिद्ध झालेले नाहीत, तरीही त्यांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवण्यात आले आहे.  यावरून स्थानिक राजकीय पक्ष केंद्र सरकारवर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे आरोप करत आहेत.

मेहबूबा मुफ्तींच्या या वक्तव्यामुळे जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा UAPA कायद्याच्या वापरावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून यावर कोणती प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा