26 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेषमेस्सीची फ्रेंच 'किक'

मेस्सीची फ्रेंच ‘किक’

Google News Follow

Related

जागतिक फुटबॉलमधील एक सर्वात मोठं नाव म्हणजे लिओनल मेस्सी. अर्जेंटीना देशाचा असणाऱ्या मेस्सीचे चाहते जगभरातील सर्व देशात आहेत. भारतातही असंख्य फॅन्स असणाऱ्या मेस्सीने काही दिवसांपूर्वी १७ वर्षे खेळत असलेला बार्सिलोना क्लब सोडण्याचा निर्णय घेतला आणि जगभरातील चाहत्यांना अक्षरश: रडू कोसळलं. खुद्द मेस्सीही क्लब सोडतानाच्या समारंभात ढसाढसा रडला. पण म्हणतात ना शो मस्ट गो ऑन तसं म्हणत मेस्सीने एका नव्या संघात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे. मेस्सीने त्याचा मित्र नेयमार ज्युनियर असणाऱ्या पॅरीस सेंट जर्मन अर्थात पीएसजी संघासोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे.

३४ वर्षीय फुटबॉल स्टार मेस्सी दाखल होत असलेल्या पीएसजी संघात नेयमासह  फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेही आहे. काही दिवंसापूर्वीच रिअल मॅड्रीड संघातून बाहेर पडलेला सर्जिओ रामोसही याच संघात गेल्याने आता हा संघ जागतिक फुटबॉलमधील एक बलाढ्य संघ बनला आहे. अवघ्या १३ वर्षांचा असताना क्लबसोबत जोडल्या गेलेल्या मेस्सीचा करार ठराविक काळानंतर पुन्हा नव्याने करण्यात येत. २०१७ मध्ये केलेला करार ३० जून, २०२१ रोजी संपला आणि क्लब आणि मेस्सी यांच्यात नवीन करारातील आर्थिक आणि संरचनात्मक अडथळ्यांमुळे नवा करार होऊ शकला नाही. ज्यामुळे अखेर मेस्सीला संघ सोडावा लागला. आता मेस्सी लवकरच पीएसजी संघासोबत स्वाक्षरी करुन त्यांच्या पॅरीस येथील घरगुती मैदानात डेब्यू करु शकतो.

हे ही वाचा:

मंदिर बंद ठेवून बार सुरू करणं हे ठाकरे सरकारचं धोरण

मंत्रालयात दारूच्या बाटल्या ही काळीमा फासणारी घटना

गेले देशमुख कुणीकडे?

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

मेस्सी आणि पीएसजी संघात होत असलेल्या कराराची किंमत अजूनही समोर आलेली नाही. जगातील सर्वात मोठा फुटबॉलपटू असणाऱ्या मेस्सीची किंमत की डोळे दिपवणारी असणार हे नक्की. पण नेमकी किंमत अजूनपर्यंत समोर आलेली नाही. मेस्सी आधी देखील पीएसजी संघाने दोनदा फुटबॉल जगतातील सर्वाधिक पैशांचे करार केले आहेत. कायलिन आणि नेयमार यांना विकत घेताना हे करार करण्यात आले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा