पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोमवारी (५ मे) इशारा दिला की, भारत काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर कोणत्याही क्षणी लष्करी हल्ला करू शकतो. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत असताना मंत्री आसिफ यांचे हे विधान आले. “भारत नियंत्रण रेषेवर कोणत्याही ठिकाणी हल्ला करू शकतो असे वृत्त आहे. भारताला योग्य उत्तर दिले जाईल,” असे मंत्र्यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकारांना सांगितले.
“आम्ही २०१६ आणि २०१७ मध्ये संयुक्त राष्ट्रांना पुरावे दिले होते, ज्यात भारत दहशतवादाला आर्थिक मदत करत असल्याचे व्हिडिओ समाविष्ट होते,” असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या घटनेची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. “अशा चौकशीमुळे भारत स्वतः किंवा कोणताही अंतर्गत गट यात सामील होता का हे उघड होईल आणि भारताच्या निराधार आरोपांमागील सत्य स्पष्ट होईल,” असे मंत्री आसिफ म्हणाले.
हे ही वाचा :
स्वतःहून अमेरिका सोडत असाल, तर १,००० डॉलर्स देऊ! ट्रम्प प्रशासनाचा नेमका निर्णय काय?
“युद्ध झाल्यास भारताला पाठिंबा देऊ…” पाकिस्तानमधील मशिदींमधून का होतायत विरोधात घोषणा?
भारतामध्ये ५ जी फोन सेगमेंटमध्ये १०० टक्के वाढ
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. भारताने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या अनेक मोठ्या निर्णयामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. तसेच भारत कधीही आपल्यावर हल्ला करू शकतो अशी भीती देखील पाक सरकारला आहे.







