28 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषदेशात ४० हजार पेक्षा जास्त जणांनी केले सरोवरांचे अमृत प्राशन

देशात ४० हजार पेक्षा जास्त जणांनी केले सरोवरांचे अमृत प्राशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी सुरु केली होती मिशन अमृत सरोवर योजना

Google News Follow

Related

जलसंधारणाच्या दिशेने केंद्र सरकारने टाकलेले पाऊल यशस्वी ठरत आहे. अमृत सरोवर योजनेचे मधुर जल आता देशवासियांना चाखायला मिळत आहे. या योजनेचे सर्वात मोठे यश म्हणजे आतापर्यंत देशभरात ४० हजार पेक्षा जास्त अमृत सरोवर बांधून पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मिशन अमृत सरोवर सुरू झाल्यानंतर अवघ्या ११ महिन्यांच्या अल्प काळात ही सरोवरे बांधण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. ग्रामीण भागातील जलसंकट संपवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ एप्रिल रोजी मिशन अमृत सरोवर योजना सुरु केली होती .

ग्रामीण भागातील पाण्याचे संकट दूर करण्याच्या उद्देशाने देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान ७५ अमृत सरोवर बांधणे आणि त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने मिशन अमृत सरोवर सुरू करण्यात आले. देशात ७५ अमृत सरोवर बांधले गेले तर भूजल वाढण्यास मोठी मदत होईल. अशा परिस्थितीत पंतप्रधान पंतप्रधांनी घेतलेला हा संकल्प पूर्ण झाला तर संपूर्ण देशातील जलसंकटाची मोठी समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

या अभियानांतर्गत १५ऑगस्ट २०२३ पर्यंत ५० हजार अमृत सरोवर बांधण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. यापैकी प्रत्येक अमृत सरोवराचे क्षेत्रफळ सुमारे एक एकर असून त्याची पाणी धारण क्षमता १०,००० घनमीटर असेल.
अमृत सरोवर योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर होतानाच देशातील दुष्काळग्रस्त भागातील पाणीप्रश्न सुटणार आहे. यासोबतच तलावांमध्ये वर्षभर पाणी उपलब्ध राहावे यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी प्रामुख्याने पावसाचे पाणी साठवून भरले जातील. अमृत ​​सरोवराच्या काठावर कडुनिंब, पिंपळ,जांभूळ आदींची रोपे लावण्यात येणार आहेत.

अमृत सरोवरच्या बांधकामासाठी देशभरात एकूण १,००,७५४ ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्यापैकी ६४,५३३ ठिकाणी बांधकामे सुरू झाली आहेत. गेल्या ११ महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत ४०,३७९ अमृत सरोवर बांधण्यात आले आहेत. प्रत्येक अमृत सरोवरसाठी ५४,००० गट तयार केले गेले असल्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाने म्हटले आहे.

हे ही वाचा:

हिंसक घटनांमुळे अमित शहांची सभा रद्द; सासारामला होणार होते भाषण

पालघरच्या समुद्रात सापडली बोट, पोलिसांनी केला पाठलाग आणि..

मालेगावचे उबाठा गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह ३२ जणांवर गुन्हा

संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

महाराष्ट्रात १, ५४९ अमृत सरोवर
मिशन अमृत सरोवर अंतर्गत महाराष्ट्रात ३,१४८ स्थळे ओळखण्यात आली आहेत. एकूण जागेपैकी २,३३२ जागी बांधकाम सुरू असून १,५४९ जागी बांधकाम पूर्ण झाले आहे. मध्य प्रदेशातील अमृत सरोवरच्या बांधकामासाठी ७,४२८ स्थळे निश्चित करण्यात आली होती, त्यापैकी ६,०५५ ठिकाणी बांधकामे सुरू असून आतापर्यंत ३,०४९ तलाव बांधण्यात आले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा