उजळल्या संध्याछाया, ४० वर्षानंतर मिळाले हरवलेले घरटे..

आमदार अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाने कठीण काम झाले साध्य

उजळल्या संध्याछाया, ४० वर्षानंतर मिळाले हरवलेले घरटे..

कांदिवली पूर्व मतदारसंघाचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे सर्वसामान्यांच्या मदतीसाठी नेहमीच धावून जातात. त्यांच्या मतदार संघात राहणारे यशवंत झवेरी हे गेली ४० वर्षे आपल्या स्वतःच्या घराच्या प्रतीक्षेत होते. एवढी वर्षे ट्रान्झिट कॅम्पमध्ये काढलेल्या झवेरीना अखेर ते घर चार दशकांच्या प्रतीक्षेनंतर आमदार भातखळकर यांच्या प्रयत्नांमुळे मिळाले. त्याची गोष्ट मोठी विलक्षण आहे.

यशवंत झवेरी हे गृहस्थ आमदार भातखळकर यांच्या मतदारसंघात राहतात. वय वर्ष ७० च्या पलीकडचे. मूळचे गिरगावचे. अमृतवाडीतील सेस बिल्डिंग कोसळल्यामुळे चाळीस वर्षांपूर्वी विस्थापित झाले. गेली ४० वर्षे त्यांची या ना त्या ट्रान्झिट कॅम्पमध्येच गेली.

हे ही वाचा:

दिल्लीच्या SIR मतदार यादीला १२ दिवसांची मुदतवाढ

या जेन झी क्रांतीचे विरोधकांना वावडे का असावे?

यवतमाळमध्ये सहा महिन्यांत १०२ शेतकऱ्यांची आत्महत्या

माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान; भक्तिरंगात न्हाऊन निघाले हजारो वारकरी!

काही दिवसापूर्वी ते भातखळकर यांना भेटले. बहुदा अखेरचा प्रयत्न करून पाहूया, असे त्यांच्या मनात असावे. ‘माझे हक्काचे घर मिळेल का?’ असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या डोळ्यातही खोल दडलेल्या निराशेसोबत अनेक प्रश्नचिन्हे होती. त्यांचे डोळे पाहून भातखळकर प्रचंड अस्वस्थ झाले.

त्यांनी प्रयत्न सुरू केले. बहुधा परमेश्वराची इच्छा असावी की,  उतार वयात तरी यशवंत झवेरी यांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे. आमदार भातखळकर अधिकाऱ्यांशी बोलले. पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. कधीकाळी गिरगावच्या अमृतवाडीतून विस्थापित झालेल्या झवेरींना गिरगावमध्ये हक्काचे ३४६ चौरस फुटांचे घर मिळाले. झवेरी यांच्याइतका  आनंद आणि समाधान भातखळकर यांनाही झाले. काही कामे तुम्हाला अक्षरशः अंतर्बाह्य सुखावून जातात, अशी प्रतिक्रिया आमदार भातखळकर यांनी व्यक्त केली.

यशवंत झवेरी यांना जी ताबा पावती मिळाली आहे. त्यात म्हटले आहे की, गिरगाव, मुंबई येथील अमृतवाडी, मानेक बिल्डींग आणि बाई मोतीबाई टेम्पल ट्रस्ट येथील रहिवाशी यशवंत आनंदजी झवेरी यांना पुनर्विकसित इमारतीतील निवासी गाळा, क्षेत्रफळ ३४६.१७ चौ. फुट हा गाळा वितरण केलेला आहे. वितरित केलेल्या गाळयाचा ताबा घेण्याची अनुमती या ताबा पावतीद्वारे देण्यात येत आहे.

आज या ताबा पावतीमुळे झवेरी यांचा आनंद गगनात मावत नाही. या पावतीत लिहिलेला मजकूर झवेरी यांच्या चेहऱ्यावर मनस्वी आनंद देणारा ठरला आहे.

Exit mobile version