27 C
Mumbai
Monday, March 23, 2026
घरविशेषआमदार अतुल भातखळकरांच्या हस्ते मालाडच्या 'ब्लिस कंपाउंड' डीपी रोडचे उद्घाटन!

आमदार अतुल भातखळकरांच्या हस्ते मालाडच्या ‘ब्लिस कंपाउंड’ डीपी रोडचे उद्घाटन!

एक्सवर पोस्टकरत दिली माहिती 

Google News Follow

Related

कांदिवली पूर्व विधानसभेतील ‘ब्लिस कंपाउंड’ मालाड पूर्व येथील डीपी रोडचे उदघाटन आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या १०-१२ वर्षात मालाड पूर्व येथे विविध विकास कामं हाती घेण्यात आली. त्याच प्रमाणे अशा अनेक डीपी रोड वर अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामं होती, अशा अनेक समस्या दूर करून लोकांच्या यातायातीसाठी आपण डीपी रोड साकारले आहेत, असे भातखळकर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ पासून देशभरात अनेक विकास प्रकल्प आणि जनहिताच्या योजना राबवण्यात आल्या. प्रत्येक योजना आज थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात मेट्रोचं जाळे विणण्यात आले. आज आपण बघू शकता नागरिकांना ह्या सुविधेचा लाभ मिळाला आहे असे उद्गार भातखळकर यांनी काढले.

नागरिकांच्या मागणी दाखल घेऊन डीपी रोडच्या समस्येचे निरसन करून आज उदघाटन करण्यात आले. नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने नागरिकांच्या सोयीसाठी डीपी रोडची भेट देण्यात आली आहे असे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा