विधिमंडळाच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकारानंतर महाराष्ट्रात त्याची चर्चा रंगली. यासंदर्भात आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना कोणत्या पोलीस ठाण्यामध्ये नेले आहे या संदर्भातील माहिती मिळत नसल्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांच्याकडून शोध घेण्यात येत होता. मात्र शोध लागत नसल्याने रोहित पवार यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर अरेरावी केली. रोहित पवार यांनी पोलिसांना केलेली दमदाटी व्हीडिओमध्ये कैद झाली आहे. रोहित पवार हे एका पोलिस सबइन्पेक्टरशी वाद घालताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
गुरूपौर्णिमेविरुद्ध डाव्यांचा कांगावा
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल!
बघितले, बघितले आणि ईडीने बघेल यांच्या घरी छापा मारला!
आवाज खाली, आवाज खाली
आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार हे समर्थकांसह पोहोचले. यावेळी पोलिसांकडून योग्य पद्धतीने उत्तर दिले जात नाही, असा दावा करत रोहित पवार हे पीएसआयवर संतापले. यावेळी वरिष्ठ पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांमधील वाद थांबवला. मात्र यावेळी रोहित पवार आवाज चढवून बोलू लागले. रोहित पवार पीएसआयला आवाज खाली, आवाज खाली अशा पद्धतीने बोलताना दिसून येत आहेत. बोलता येत नसेल, तर बोलायचं नाही असे रोहित पवार म्हणत होते.या दमदाटीचा व्हिडिओ समोर येतात रोहित पवार यांनी खुलासा केला. ते म्हणाले की, कार्यकर्ता नितीन देशमुख कुठे आहे याची विचारणा पोलिसांकडे करत होतो. पोलिस आयुक्तांनी तो आझाद मैदान पोलिस ठाण्यात असल्याची असल्याची माहिती दिली. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो तेव्हा पोलिस आमदारांशी नीट बोलत नसतील, तर ते गरिबांशी कसे बोलतील? असा सवाल केला. एखाद्या गरीबाला तर कानाखाली मारतील असं रोहित पवार यांनी आपल्या खुलाशामध्ये म्हटलं आहे.
आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना अटक केल्याची माहिती समजताच जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीखालीच शिरले आणि गाडी थांबविली. त्यांनी गाडीच्या समोरच्या बाजुला असलेली जाळी धरली आणि वाकवली. पण ते बाहेर येत नव्हते. पोलिसांनी शेवटी त्यांना खेचून बाहेर काढले.







