35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषमराठी पाट्या न लावल्यानं मनसे आक्रमक,ठाण्यातील दुकानांच्या पाट्यांना फासलं काळं!

मराठी पाट्या न लावल्यानं मनसे आक्रमक,ठाण्यातील दुकानांच्या पाट्यांना फासलं काळं!

सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आलेली २५ नोव्हेंबरची मुदत संपल्यानंतर मनसेचे खळखट्याक

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी पाट्या लावा अन्यथा खळखट्याक, असा मजकूर असलेला बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काही दिवसापूर्वी चेंबूर स्थानकाबाहेर लावण्यात आला होता.शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत, मराठी पाट्या करा अन्यथा मनसेचा दणका, असा मजकूर असलेला बॅनर मनसेकडूनलावण्यात आला होता.महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्यासाठी उच्च न्यायालयानं २५ नोव्हेंबरची मुदत दिली होती ती आता संपलीय आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे.ठाण्यात मराठी पाटी नसलेल्या शोरूमला मनसेकडून काळे फासण्यात आले आहे.

मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतलीय. त्यात कोर्टाने दिलेल्या देडलाईन नंतरही राज्यात अजून काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केल्या नाहीत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक होण्याची चिन्ह दिसत होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर ठाण्यात दुकानांच्या पाट्यासंदर्भात मनसेचे आंदोलन केले आहे. ठाण्यात मनसेकडून एमजी मोटर्स शोरुमला काळे फासण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानमध्ये पुन्हा एक हिंदू मंदिर उद्ध्वस्त!

कोची विद्यापीठातील कॉन्सर्टमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू!

तोंडावर मुक्का मारल्याने पतीचा मृत्यू!

दगडफेकीच्या घटनेबाबत नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा!

मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेच्या या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले की, दुकानांना मराठी पाट्या असणे आवश्यकच आहे. सर्वोच्च न्यायालयानं पुरेशी मुदतही दिली आहे. जे करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जे काळं फासतील त्यांच्याविरोधात केस दाखल करण्यात येणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणालेत.

दरम्यान, या अगोदर सुप्रीम कोर्टाने देखील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे दिले होते.मराठी पाट्या लावण्याबाबत कोर्ट म्हणाले होते की, कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा. येत्या दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्याची ही नामी संधी आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्यांत मुंबईसह राज्यभरातील सर्व दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या दिसण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा