28.9 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरविशेषमोदी सरकारकडून 'ऑक्सिजन एक्सप्रेस' सुरु

मोदी सरकारकडून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ सुरु

Google News Follow

देशभरात सध्या कोरोना व्हायरसचं थैमान पाहायला मिळत असून, त्यामध्येच आणखी एका संकटाचीही भर पडताना दिसत आहे. हे संकट म्हणजे ऑक्सिजनचा तुटवडा. राज्याराज्यांमध्ये होणारा ऑक्सिजन तुटवडा भरुन काढण्यासाठी म्हणून केंद्र सरकारनंही आता काही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच अंतर्गत आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रविवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. ऑक्सिजन एक्सप्रेस या रेल्वे धावण्यासाठी ग्रीन कॉरिडोर सुरु करण्यात येणार असून, त्या माध्यमातून राज्यांना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा केला जाणार आहे.

ऑक्सिजन सिलेंडर आणि टँकर रेल्वेच्या माध्यमातून विविध ठिकाणांवर पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामध्ये ग्रीन कॉरिडोरनं मोठी मदतही होणार आहे.

‘नऊ क्षेत्र वगळता २२ एप्रिलपासून तात्पुरती गरज म्हणून औद्योगिक कारणांसाठी होणारी ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा थांबवण्यात येणार आहे. रुग्णालयांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे’, असं गोयल म्हणाल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलं आहे.

कोविडचं संकट येण्यापूर्वी भारतात दर दिवशी १,०००-१,२०० मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनची गरज लागत होती. पण, १५ एप्रिलला देशात ४७९५ मेट्रिक टन इतका ऑक्सिजन वापरला गेला; ही वस्तुस्थिती मांडत त्यांनी देशात मागच्या वर्षीपासून ऑक्सिजन निर्मितीचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगितलं.

हे ही वाचा:

कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल

देशभरात आढळले अडीच लाखापेक्षा जास्त कोरोना रुग्ण

ठाकरे सरकारच्या कारभाराचा त्यांच्याच नेत्यांना वैताग

रडत बाजीराव आणि चाय-बिस्कुटी प्रचार

१२ राज्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रत्येत राज्याच्या गरजेनुसार आता, ६१७७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. असं असलं तरीही राज्य शासनानं त्यांच्या ऑक्सिजन वापरावर नियंत्रण ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा